एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

तू माझ्यासाठी खूप केलंस आता सहन होईना

तू माझ्यासाठी खूप केलंस आता सहन होईना, कोल्हापुरात पत्नीला शेवटचा भावनिक संदेश, सावकाराला कंटाळून श्रीधरने संपवलं जीवन!

(कोल्हापूर जिल्हा) प्रतिनिधी.

पती-पत्नीची जन्मोजन्मीची साथ असते असं मराठी म्हण आहे. पण कोल्हापुरातून सावकाराच्या त्रासाला कंटाळून आणि आपल्या पत्नीला भावनिक संदेश देत पती श्रीधरने आपलं जीवन संपवले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यांतील सोनगे येथील श्रीधर दत्तात्रेय डावरे (वय 48) रा. सोनगे ता.कागल जि. कोल्हापूर ) यांनी आपल्या पत्नीला भावनिक संदेश देत आपले जीवन संपवले आहे. यावेळी श्रीधरने पत्नी सविता हिला व्हाट्सअप माध्यमांतून माझ्यासाठी तू खूप केलंस आता मला सहन होई ना, असा भावनिक संदेश देत आपली जीवन यात्रा संपवली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून श्रीधर दत्तात्रेय डावरे यांनी सावकार निवास आप्पासो पाटील यांच्याकडून जवळपास 9 लाख रुपये व्याजाने घेतले होते या कर्जापोटी डावरे ने त्याला आत्तापर्यंत 26 लाख रुपये परत केले होते. एवढी मोठी रक्कम देऊनही सावकार निवास पाटील त्याच्याकडून आणखीन 25 लाख रुपयांची मागणी करीत होता आणि श्रीधरला सतत मारहाण व दमदाटी करीत होता. या प्रकरणी श्रीधर यांच्या पत्नी सविता डावरे यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात आरोपी सावकार निवास पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील करीत आहेत.*

 

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link