एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

बसमध्ये चढताना वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास; संशयित महिला पोलिसांच्या ताब्यात

बसमध्ये चढताना वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास; संशयित महिला पोलिसांच्या ताब्यात

उप संपादक | प्रणित काठोके

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास; ३ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन वाट्या हस्तगत

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर शहरातील बसस्थानक परिसरात बसमध्ये चढत असताना ७० वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रातील सोन्याच्या वाट्या चोरीला गेल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी घडली होती. या प्रकरणाचा मुक्ताईनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत संशयित महिलेला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमिला जगन्नाथ चौधरी (वय ७०, रा. वाघोदा, ता. रावेर) या मुक्ताईनगर शहरातील बसस्थानक परिसरात बसमध्ये चढत असताना अज्ञात महिलेने त्यांच्या गळ्यातील अंदाजे ८ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरल्याची तक्रार दिली होती. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात CCTNS क्रमांक ३३२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित महिलेचा शोध घेतला. संशयित महिला मुक्ताईनगर बसस्थानक परिसरात आढळून आल्यानंतर तिला पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
चौकशीदरम्यान संबंधित महिलेने घटनेची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच तिच्या राहत्या घरातून सुमारे ३ ग्रॅम वजनाच्या मंगळसूत्रातील दोन सोन्याच्या वाट्या, अंदाजे ४५ हजार रुपये किमतीच्या, पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गायकवाड आणि मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदूराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी कल्पेश आगमोदकर, असीम तडवी, पोलीस नाईक सुरेश म्हडे, पोलीस अंमलदार रितेश चव्हाण, स्वप्निल पवार, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा पाटील व किर्ती भिसे यांनी कारवाई केली.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, संशयित महिलेकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link