एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या कार्यपद्धतीची नागरिकांमध्ये चर्चा

पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या कार्यपद्धतीची नागरिकांमध्ये चर्चा

वाहतूक कोंडीच्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून करतात वाहतूक सुरळीत; कर्णकर्कश बुलेटवरही कारवाईचा धडाका

अकोला जिल्हा प्रतिनिधी निळकंठ वसू 7820899963

अकोला शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेने अधिक सक्रिय भूमिका घेतली असून, पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी कारभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कार्यपद्धतीची शहरातील सामान्य नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

शहरातील एखाद्या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याची माहिती मिळताच केवळ कर्मचाऱ्यांना सूचना देण्याऐवजी पोलीस निरीक्षक विलास पाटील स्वतः वाहतूक कोंडीच्या ठिकाणी उपस्थित राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह सामान्य नागरिकांचेही लक्ष त्यांच्या कार्यपद्धतीकडे वेधले गेले आहे.

विशेषतः रेल्वे पुलावर वारंवार निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी वाहतूक शाखेकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गर्दीच्या वेळी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि नियोजनामुळे या मार्गावरील वाहतुकीला शिस्त लावण्यास मदत होत आहे.

दरम्यान, अकोला शहरातील नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनांवरही वाहतूक शाखेने कारवाई सुरू केली आहे. मॉडिफाइड सायलेन्सर बसवून मोठ्या आवाजात वाहने चालविणाऱ्या अनेक बुलेटस्वारांवर कारवाई करण्यात आली असून, काही वाहनांचे सायलेन्सर काढून नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.

“कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटच्या त्रासापासून अकोला शहर लवकरच मुक्त होईल,” असा विश्वास पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी व्यक्त केला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाहतूक कोंडीच्या ठिकाणी अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करत असल्याने “अधिकारी स्वतः मैदानात उतरले” अशी चर्चा सध्या सामान्य नागरिकांमध्ये होत आहे. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सुरू असलेल्या या प्रयत्नांमुळे नागरिकांना दिलासा मिळत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link