एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

गोवंश मांस प्रकरणात आरोपीला १ वर्ष सश्रम कारावास; तेल्हारा पोलिसांच्या तपासाला न्यायालयीन शिक्कामोर्तब

गोवंश मांस प्रकरणात आरोपीला १ वर्ष सश्रम कारावास; तेल्हारा पोलिसांच्या तपासाला न्यायालयीन शिक्कामोर्तब

₹२ हजार दंडाचीही शिक्षा; पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे न्यायालयात गुन्हा सिद्ध — गोवंश मांस विक्री करणाऱ्यांमध्ये धडकी

अकोला जिल्हा प्रतिनिधी निळकंठ वसू पाटील

तेल्हारा : गोवंश मांस प्रकरणात तेल्हारा पोलिसांनी केलेल्या प्रभावी तपासामुळे न्यायालयात गुन्हा सिद्ध झाला असून, आरोपी शेख फिकरी शेख नासिर कुरेशी (वय ३९) याला १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच न्यायालयाने आरोपीला ₹२ हजार दंडाचीही शिक्षा ठोठावली आहे. या निकालामुळे गोवंश मांसाच्या अवैध वाहतूक-विक्रीविरोधातील कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी पंचगव्हाण-भांबेरी रोडवर आरोपीला मोटरसायकलवरून अंदाजे ६० किलो गोवंश मांस घेऊन जाताना पकडण्यात आले होते. या प्रकरणी तेल्हारा पोलीस ठाण्यात गु.र.क्र. १८५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील संबंधित कलमांनुसार पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली.

तपासाची कागदपत्रे न्यायालयात ठरली निर्णायक

तेल्हारा पोलिसांनी प्रकरणाचा तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यानंतर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, तेल्हारा यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत आरोपी दोषी सिद्ध झाला. न्यायालयाने त्याला एक वर्ष सश्रम कारावास आणि ₹२ हजार दंड अशी शिक्षा सुनावली.

या निकालामुळे केवळ गुन्हा दाखल करून थांबण्याऐवजी पुरावे संकलित करून न्यायालयात दोष सिद्ध होईल अशा पद्धतीने तपास करण्याची तेल्हारा पोलिसांची भूमिका अधोरेखित झाली आहे.

पोलिसांच्या कारवाईमुळे अवैध मांस विक्री करणाऱ्यांमध्ये धडकी

गोवंश मांसाची अवैध वाहतूक किंवा विक्री करणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार कारवाई सुरू राहणार असल्याचा स्पष्ट संदेश या प्रकरणातील न्यायालयीन निकालातून मिळाला आहे. तेल्हारा पोलिसांच्या तपासामुळे प्रकरण न्यायालयात सिद्ध झाल्याने अशा प्रकारच्या अवैध कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांमध्ये कायद्याची धास्ती निर्माण झाली आहे.

तपास व न्यायालयीन पैरवी प्रभावी

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मधुकर पाटील यांनी केला. सरकारी अभियोक्ता एस. एस. सहारकर यांनी न्यायालयीन बाजू मांडली, तर पैरवी अधिकारी सफौ. निकम, पोलीस स्टेशन तेल्हारा यांनी प्रभावी पैरवी केली.

या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील आणि तेल्हारा पोलीस निरीक्षक संतोष इंगळे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

न्यायालयीन निकालामुळे तेल्हारा पोलिसांच्या तपासाला बळ मिळाले असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पुराव्यानिशी कारवाई आणि प्रभावी न्यायालयीन पैरवी किती महत्त्वाची आहे, हे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link