एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आंतरराष्ट्रीय ह्यूमन राइट्स मानव अधिकार टीमचा पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण उपक्रम; पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक

आंतरराष्ट्रीय ह्यूमन राइट्स मानव अधिकार टीमचा पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण उपक्रम; पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक

प्रतिनिधी : सरवर खान

पर्यावरण संरक्षण आणि मानवतेची सेवा या उद्देशाने इंटरनेशनल ह्यूमन राइट्स मानव अधिकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
या उपक्रमाचे नेतृत्व संघटनेचे सीईओ इमरान परवेज, महाराष्ट्र अध्यक्ष इमरान खान, उपाध्यक्ष अब्दुल कादिर आणि वर्धा जिल्हाध्यक्ष विपुल पाटील यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी “वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे” असा संदेश देत प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलन लक्षात घेता अशा उपक्रमांची आजच्या काळात अत्यंत आवश्यकता असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
पर्यावरण संरक्षणासोबतच सामाजिक उत्तरदायित्व जपत राबविण्यात आलेल्या या अभियानामुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचला असून भविष्यातही अशाच जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या यशस्वी मोहिमेबद्दल नॅशनल जनरल सेक्रेटरी अब्दुल मलिक यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहभागी नागरिकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link