एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

खाजगी वाहनांवरील ‘पोलीस’ पाटीवर कारवाई; अपर पोलीस महासंचालकांचे राज्यभर आदेश

खाजगी वाहनांवरील ‘पोलीस’ पाटीवर कारवाई; अपर पोलीस महासंचालकांचे राज्यभर आदेश

मुंबई | सखाराम कुलकर्णी

राज्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांनी स्वतःच्या खाजगी वाहनांवर लाल रंगातील ‘पोलीस’ अशी पाटी किंवा पोलीस नाव दर्शविणारे फलक लावण्याच्या प्रकारावर आता प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांच्या कार्यालयातून अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तांना जारी करण्यात आले आहेत.

उच्च न्यायालयाने अशा प्रकारांबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. खाजगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी पाटी असल्यामुळे वाहन तपासणी टाळली जाणे, पार्किंग व टोलसंदर्भात गैरफायदा मिळणे, तसेच अशा वाहनांचा गैरवापर होण्याची शक्यता वाढत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी यांनी २७ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात निवेदन सादर करून खाजगी वाहनांवर ‘पोलीस’ नावाचा वापर रोखण्याची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाने ३१ जुलै रोजी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले.

आदेशानुसार, खाजगी वाहनावर ‘पोलीस’ अशी पाटी किंवा लाल अक्षरात ‘पोलीस’ नाव लिहिल्याचे आढळल्यास महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम १३३(६) तसेच मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १७७ अंतर्गत संबंधित वाहनचालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे खाजगी वाहनांवर ‘पोलीस’ पाटी लावण्याच्या प्रकाराला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त करत तक्रारदार सखाराम कुलकर्णी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link