बस स्थानकात चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक करुन मुहमाल केला जप्त
बीड प्रतिनिधी संगीता ईनकर
पोलीस स्टेशन माजलगाव शहर हद्दीत दिनांक 15/07/2026 रोजी दपारी 04.00 वा. सुमारास नविन बस स्थानक माजलगाव एक महिला बसमध्ये चढत असताना तीच्या गळ्यातील सोन्याची पोत. दोन अज्ञात चोरट्याने चोरी केल्याने फिर्यादी नामे सखुबाई मुरलीधर गायकवाड वय 70 वर्षे व्यवसाय घरकाम रा. वाघोरा ता माजलगाव यांचे फिर्यादवरुन पोस्टे येथे गुरनं 239/2026 कलम 303(2) BNSप्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचे तपासा दरम्याण सदर घटनास्थळावरील व परीसरातील उपलब्ध सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे व तांत्रीक विष्लेशनाद्वारे यातील आरोपी निष्पन्न करुन आरोपी नामे।) सारीका गोरक्ष शिंदे वय-36 वर्ष व्यवसाय-मजुरी रा.शंकरनगर पाथर्डी ता. पाथर्डी जि. अहमदनगर 2) वैजीनाथ नामदेव गुंजाळ वय-55 वर्ष व्यवसाय-मजुरी रा. गांधीनगर बीड ता.जि. बीड. यांना दिनांक 27/07/2026 रोजी अटक करुन अटके दरम्याण त्यांचेकडुन गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्याची पोत ज्यामध्ये 100 मनी व दोन डोरले असा एकुण 7 ग्रॅम वजनाचे 34,790/-रु.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, अपर पोलीस अधिक्षक मा. चेतना तिडके मॅडम, उपविभागीय अधिकारी आशोक आनंत्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, सहा. पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर, शिवाजी पवार, पोह/1363 किशोर जाधव, पोह/212 गोविंद पाखरे, पोकाँ/1926 महेश चव्हाण, यांनी केलेली आहे.








