एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

कोट्यवधींच्या कथित आर्थिक गैरव्यवहारावरून वाद; वकील कीर्ती आहुजा यांच्याबाबत गंभीर आरोपांचा दावा

कोट्यवधींच्या कथित आर्थिक गैरव्यवहारावरून वाद; वकील कीर्ती आहुजा यांच्याबाबत गंभीर आरोपांचा दावा

| प्रतिनिधी हनुमंत दवंडे

पुण्यात मालमत्तेशी संबंधित प्रकरणे हाताळणाऱ्या वकील कीर्ती आहुजा यांना कथितपणे कटकारस्थानातून गुंतविण्यात आल्याचा दावा समोर आला आहे. राजन कक्कर आणि इशान कक्कर यांच्याविरोधात कोट्यवधी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहार आणि अपहाराचे आरोप करण्यात आले असून, या प्रकरणामुळे कायदेवर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘फाईट फॉर युवर राईट’ या कायदेशीर जनजागृती मोहिमेच्या व्यवस्थापक असलेल्या वकील कीर्ती आहुजा या नागरिकांना कायदेशीर मार्गदर्शन आणि जागरूकता निर्माण करण्याचे काम करतात. दावा असा आहे की, त्यांना राजन कक्कर आणि इशान कक्कर यांच्या कथित आर्थिक व्यवहारांची माहिती मिळाल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात मांडण्याची तयारी सुरू होती.
याच दरम्यान, इशान कक्कर यांनी वकील कीर्ती आहुजा यांचे भाऊ दीपक आहुजा यांच्याकडे १० कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यापैकी ३० लाख रुपये तातडीने देण्यात आल्याचा आरोप असून उर्वरित रक्कम नंतर देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले जात आहे.
त्यानंतर या कथित व्यवहारांची माहिती कीर्ती आहुजा आणि राधा मोहन मिश्रा यांना मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, इशान कक्कर यांनी विविध खात्यांमधून आणि कर्जाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. या दाव्यांनुसार, अनेक बँकांकडून नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या.
दरम्यान, या सर्व आरोपांबाबत संबंधित व्यक्तींची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही. तसेच, या आरोपांबाबत न्यायालयीन किंवा तपास यंत्रणांकडून अंतिम निष्कर्ष जाहीर झालेला नाही.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link