एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

साबळेवाडी येथे वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी

साबळेवाडी येथे वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी

प्रतिनिधी अशोक पाचुंदकर

शिरूर तालुक्यातील साबळेवाडी (टाकळी हाजी) येथे अज्ञात चोरट्याने वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साबळेवाडी येथील श्रीमती शालू भीवराज कदम (वय ७० वर्षे, रा. साबळेवाडी, टाकळी हाजी, ता. शिरूर) या घराजवळ असताना एक अनोळखी इसम त्यांच्या जवळ आला. बोलण्याच्या बहाण्याने जवळ येत त्याने त्यांच्या गळ्यातील अंदाजे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तोडून घेतले व दुचाकीवरून पसार झाला. चोरी गेलेल्या दागिन्याची किंमत अंदाजे ८० हजार रुपये आहे.
या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. खटीक हे करत आहेत. अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी शिरूर पोलीस ठाण्याचे पथक तपास करत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link