पुणे प्रतिनिधी : शंकर जोग | शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच पक्षाच्या यशस्वी वाटचालीबद्दल पुणे शहर शिवसेनेच्या वतीने येरवडा येथील तारकेश्वर महादेव मंदिरात विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी महादेव मंदिरात अभिषेक करून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.
यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी नागरिकांना लाडू व पेढ्यांचे वाटप केले. तसेच गरीब व गरजू नागरिकांना ब्लँकेट वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला. शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास शिवसेना पुणे उपशहर प्रमुख सुनील जाधव, उपशहर प्रमुख सचिन थोरात, संजय डोंगरे, उपशहर प्रमुख प्रमोदभाऊ प्रभुणे, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख अनिल गडकरी, पुणे उपशहर संघटक उद्धव गलांडे, श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे पुणे शहर प्रमुख रोहित बाप्पू कसबेकर, शिवसेना मागासवर्गीय विभाग पुणे शहर प्रमुख महेंद्र गायकवाड, शिवसेना पुणे शहर समन्वयक शंकर संगम, शहर संघटक अनिल बटाणे, समाजसेविका स्नेहल जाधव, वडगाव शेरी विभाग संघटक संदीप सावंत, समाजसेवक किशोर वाघमारे, अनिल कर्चन, दीपक आहिरे, शाखाप्रमुख सनी गायकवाड, वडगाव शेरी उपविभाग प्रमुख धनंजय कोटावले यांच्यासह अनेक शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाद्वारे धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक सेवाभाव यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. उपस्थितांनी शिवसेनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत पक्षाच्या कार्याला अधिक बळ मिळो, अशी अपेक्षा व्यक्त केली.








