एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आमदार चषक २०२६ खुल्या क्रिकेट स्पर्धांना सुरूवात

आमदार चषक २०२६ खुल्या क्रिकेट स्पर्धांना सुरूवात

प्रतिनिधी नांदेड मुखेड विलास चव्हाण

आ. डॉ. तुषार राठोड यांच्या हस्ते उद्घाटनः विजेत्यासाठी ५१ हजारांचे बक्षीसः टीजीआर क्रिकेट क्लबचे आयोजन, खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुखेडः येथील पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलीचे मैदान येथे तालुकास्तरीय ‘आमदार चषक २०२६’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मुखेड-कंधार मतदारसंघाचे आ. डॉ. तुषार राठोड यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

टीजीआरक्रिकेट क्लब मुखेड यांच्या वतीने या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ५१,००० रुपये हे सोहेल सय्यद यांच्या वतीने, द्वितीय पारितोषिक ३१,००० रुपये ओमप्रकाश चौधरी यांच्या वतीने, तृतीय पारितोषिक २१,००० रुपये दीपक लोहबंदे यांच्या वतीने तर चतुर्थ पारितोषिक ११,००० रुपये निवृत्त प्राचार्य प्राचार्य डी. एन.

गायकवाड सर यांच्या वतीने ठेवण्यात आले आहे.

याशिवाय उत्कृष्ट संघ ५,५५५ रुपये शौकत होनवडजकर, मॅन ऑफ द सिरीज ५,१०० रुपये पवन पोद्दार, फायनल मॅन ऑफ द मॅच २,१०० रुपये गजानन लंगेवाड, बेस्ट बॅट्समन १,१०० रुपये चंद्रकांत कोत्तापल्ले यांच्या वतीने तर विजेत्या खेळाडूंसाठी ट्रॉफी राजीव गंदपवाड यांच्या सौजन्याने देण्यात येणार आहे. यावेळी आ. डॉ. तुषार राठोड म्हणाले, खेळातून शिस्त, सांघिक भावना व नेतृत्वगुण विकसित होतात. मुखेड तालुक्यातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवावा हीच अपेक्षा आहे.

या उद्घाटन सोहळ्यास भाजपा विधानसभा प्रमुख खुशालराव पाटील,

माजी सभापती लक्ष्मणराव पाटील खैरकेकर, भाजपा उपजिल्हाध्यक्ष अशोकराव गजलवाड, भाजपा जिल्हा चिटणीस किशोरसिंह चौहान, संचालक व्यंकटराव लोहबंदे, माजी जि.प. सदस्य संतोष बोनलेवाड, डॉ. रंजित काळे, भाजपा

उपनगराध्यक्ष राजकुमार बामणे, भाजपा मंडळ अध्यक्ष बालाजी पाटील, कृ. उ. बा. समिती संचालक हनमंत नरोटे, भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष शिवाभाऊ आलेवार बेळीकर, गटनेते नागनाथ लोखंडे, आनंदराव पाटील जुन्ने, स्वीय सहाय्यक सुधीर चव्हाण, शिवाजी राठोड, नगरसेवक विनोद दंडलवाड, मैनुद्दीन शेख, बजरंग कल्याणी, गजानन लंगेवाड, हेमंत घाटे, नगरसेवक प्रतिनिधी दिलीप चव्हाण, हरून शेख, पंडित पाटील वेळीकर, संजय तमशेट्टे, शहराध्यक्ष करण रोडगे, सरपंच सतीश भालेराव, उत्तम बनसोडे, अहमदशेठ बेळीकर, बाळू नाईक, पत्रकार यशवंत बोडके, कमलाकर आगदे, मनोज कांबळे, गजानन अकुलवाड, खाजा धुंदी, राजू राठोड, विकास चव्हाण, सचिन चव्हाण आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन टीजीआर क्रिकेट क्लब मुखेडचे संयोजक दर्शन यादव, रिजवान मोमीन, चंद्रकांत कोत्तापल्ले, शुभम पाटील व सागर यादव यांनी केले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link