एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जामनेर पोलिसांची धडक कारवाई ; ६७ गोवंशीय जनावरांची सुटका

जामनेर पोलिसांची धडक कारवाई ; ६७ गोवंशीय जनावरांची सुटका
अवैध वाहतूक आणि कत्तलीविरोधात विशेष मोहीम, जळगाव गोशाळेत सुरक्षित रवानगी

प्रतिनिधी | प्रणित काठोके

गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक, अवैध कत्तल तसेच अनधिकृत कत्तलखान्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी जामनेर पोलिस प्रशासन आणि नगर परिषद प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तब्बल ६७ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून त्यांची जळगाव येथील गोशाळेत सुरक्षित रवानगी करण्यात आली आहे.
ही मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहेम यांच्या नेतृत्वात पार पडली. यामध्ये जामनेर, पहूर आणि फत्तेपूर पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांसह नगर परिषद प्रशासनाने सक्रिय सहभाग घेतला.
विशेष तपासणी मोहिमेदरम्यान घोडे पीर बाबा दर्गा परिसर, मदनी नगर, इस्लामपुरा, पहूर गल्ली आदी भागांमध्ये अचानक छापेमार कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान अंदाजे ६ लाख १० हजार रुपये किमतीची ६७ गोवंशीय जनावरे ताब्यात घेण्यात आली. एका ठिकाणी गोवंशीय मांसही आढळून आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
सुटका करण्यात आलेल्या जनावरांचे संगोपन व संवर्धन व्हावे यासाठी त्यांना जळगाव येथील गोशाळेत पाठविण्यात आले आहे. तसेच संबंधित आरोपींविरोधात महाराष्ट्र प्राणीसंवर्धन अधिनियम १९७६ अंतर्गत जामनेर पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या संपूर्ण कारवाईत पोलीस अधिकारी, कर्मचारी, नगर परिषद आरोग्य विभागाचे अधिकारी व सफाई कर्मचारी यांनी संयुक्तरीत्या सहभाग घेत मोहिम यशस्वी केली. पुढील काळातही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तसेच नागरिकांनी गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक, अवैध कत्तल किंवा अनधिकृत कत्तलखान्यांबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link