एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

फेडरेशनच्या वतीने सामाजिक संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींची चिंतन बैठक संपन्न. बैठकीत विभागीय व जिल्हा कार्यकारणी जाहीर

फेडरेशनच्या वतीने सामाजिक संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींची चिंतन बैठक संपन्न. बैठकीत विभागीय व जिल्हा कार्यकारणी जाहीर

नांदेड- सामाजिक कार्य करणाऱ्या सेवाभावी मान्यता असलेल्या संस्था, संघटना एकत्र येऊन महासंघ म्हणजेच फेडरेशन स्थापन झालेल्या प्रतिनिधींची चिंतन बैठक छत्रपती संभाजीनगर येथे नुकतीच संपन्न होऊन, या बैठकीत विभागीय अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी तर उपाध्यक्षपदी संपादक अनिता वानखडे यांची एक मताने निवड झाली.
माहितीचा अधिकार सुदृढ करणे, भ्रष्टाचार प्रतिबंध करणे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी काम करणाऱ्या संस्था संघटनांचे प्रतिनिधी हे खरे लोकसेवक व लोकप्रतिनिधी असतात आणि संविधान प्रमाणे या देशाचे मालक असून असंघटितपणामुळे अस्तित्वहीन आहेत. म्हणून या सर्व सामाजिक कार्य करणाऱ्या सेवाभावी मान्यता असलेल्या संघटना एकत्र येऊन फेडरेशन स्थापन झाले. या फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश लोखंडे मुंबई तर सचिव विठोबा द्यानद्यान नाशिक हे आहेत. या फेडरेशनची नागपूर, अमरावती विभागीय बैठका संपन्न झाल्यानंतर नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय प्रतिनिधींची चिंतन बैठक सुरेश लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या चिंतन बैठकीत फेडरेशन स्थापन करण्याचा हेतू सांगताना अध्यक्ष लोखंडे म्हणाले बहुसंख्य नोकरवर्ग संघटितपणे बेकायदेशीर कृत्य बिनधास्तपणे करीत आहे. या परिस्थितीला कायदेशीर मार्गाने हाताळण्यासाठी योग्य विचार विनिमय प्रत्यक्ष होणे आवश्यक आहे. म्हणून संबंधित विषयांवर काम करणाऱ्या संस्था संघटना यांचे जबाबदार प्रतिनिधी व अभ्यासक यांचे करिता विभागीय एक दिवशीय चिंतन बैठक घेण्याचे ठरवले. व ही तिसरी विभागीय चिंतन बैठक छत्रपती संभाजीनगर मधील गांधी भवन येथे संपन्न झाली. या बैठकीत उपस्थित संस्था प्रतिनिधींनी आपले कार्य, विचार व कार्य करताना येत असलेल्या अडचणी सांगितल्या. याच बैठकीत विभागीय कार्यकारिणी व जिल्हास्तरीय कार्यकारणी अध्यक्ष सुरेश लोखंडे यांनी जाहीर करून नियुक्तीपत्र दिले.छत्रपति संभाजीनगर विभागीय अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी नांदेड यांची एक मताने निवड झाली. उपाध्यक्ष अनिता वानखडे, सचिव राजाभाऊ पवार, तर सदस्य पदी संतोष खाजिना व आम्रपाली साबळे यांची निवड झाली. तसेच जिल्हाध्यक्ष पदी निवड करताना बीड जिल्हा अध्यक्षपदी मुकुंद ताटे, परभणी जिल्हाध्यक्ष किरण चक्रपाणी,व धाराशिव त्र्यंबकेश्वर मुंडे यांची निवड होऊन उर्वरित जिल्हाध्यक्ष लवकरच नियुक्त होतील असे त्यांनी जाहीर केले. आजच्या या चिंतन बैठकीस फेडरेशनचे सचिव विठोबा द्यानद्यान, कार्यकारी सदस्य राजकुमार कांबळे, गणेश लाड अल्ताफ खान आदी सह बऱ्याच सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधींची उपस्थिती होती.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link