एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मुंबईमध्ये रीलस्टारच्या घरात गुन्हे शाखेच्या पथकाची धाड, कारवाईत बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा साठा जप्त

मुंबईमध्ये रीलस्टारच्या घरात गुन्हे शाखेच्या पथकाची धाड, कारवाईत बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा साठा जप्त

प्रतिनिधी मुकुंद मोरे

मुंबईमध्ये रीलस्टारच्या घरात गुन्हे शाखेच्या पथकाकडून धाड टाकण्यात आली आहे. या कारवाईत बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे. ठाण्यामधील डोंबिवलीचा हिस्ट्रीशीटर आणि सोशल मीडियावरील रील स्टार सुरेंद्र पाटील हा पुन्हा एकदा पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकला आहे. काही दिवसांपुर्वी रील स्टार सुरेंद्र पाटील हा जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता. ठाणे गुन्हे शाखेने शनिवारी सुरेंद्र पाटीलच्या घरात धाड टाकून शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला आहे.
घरात मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र सापडल्याने ठाणे पोलीसही चक्रावून गेले आहे. माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने दावडी येथील सुरेंद्र पाटील याच्या घरात रात्री धाड टाकली आहे. झडती घेत असताना पोलिसांची नजर बंगल्यातील एका शू-रॅकवर पडली. बंगल्याच्या इंटिरिअरशी न जुळणारे हे शू-रॅक पाहून पोलिसांना संशय आला. जेव्हा त्या शू-रॅकची तपासणी करण्यात आली, तेव्हा त्यातील एका गुप्त कप्प्यात शस्त्रास्त्रांचा मोठा साठा लपवुन ठेवल्याचे उघडकीस आले आहे.
या कडक कारवाईत ठाणे पोलिसांनी 7 बंदुका, 371 जिवंत काडतुसे आणि 167 एअर गनच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या या साठ्याची किंमत 10 लाख रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. जप्त करण्यात आलेल्या 7 बंदुकांपैकी 5 देशी बनावटीची पिस्तूले आणि रिव्हॉल्व्हर आहेत, तर 2 एअर गन आहेत. काही पिस्तुलांवर आणि मेड इन युएसए आणि स्पेशल ऑटो असे कोरलेले आहे. पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी माहिती दिली की, मोठ्या प्रमाणावर जिवंत काडतुसे सापडली आहे.
हा साठा केवळ प्रदर्शनासाठी नसून तो वापरण्यासाठी सज्ज होता. सुरेंद्र पाटील हा इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय आहे. त्याचे ३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. स्वतःची गुंडगिरी आणि भाईगिरी दाखवणारे रिल्स तो सतत पोस्ट करत असतो. अटक झाल्यानंतर त्याने हा साठा केवळ रिल्समध्ये दाखवण्यासाठी ठेवल्याचा दावा केला आहे. मात्र, त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पोलीसांचा या दाव्यावर विश्वास नाही. हा शस्त्रसाठा स्थानिक गुन्हेगारांना पुरवण्यासाठी वापरला जात होता का या प्रकरणात अधिक तपास आता ठाणे पोलिस करत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link