दरोडयाच्या तयारीतील गुन्हयातील पाहिजे आरोपीस केले जेरबंद
उप संपादक गणेश महाडिक
दि.३०/०३/२०२६ रोजी गुन्हे शाखा, युनिट ७ कडील सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार निर्णय लांडे, ऋषीकेश ताकवणे व नितीन घाडगे असे वाघोली भागात कोंबींग ऑपरेशन दरम्यान फरारी व पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, चंदननगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३७६/२०२५, भा.न्या.सं.क. ३१० (४),३१० (५) सह भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी नामें योगेश संजय शिरसाट, वय २४ वर्षे, रा. प्रतिक मंगल कार्यालया समोर भाजी मंडई वडगावशेरी पुणे हा वाघेश्वर चौक वाघोली ता. हवेली जि.पुणे येथे थांबला आहे. अशी माहिती मिळाल्याने बातमीप्रमाणे सापळा रचुन सदर आरोपीस वाघेश्वर चौक वाघोली ता. हवेली जि. पुणे येथुन ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईकामी चंदननगर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२ पुणे शहर श्री. राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे युनिट यांचे सुचनांप्रमाणे गुन्हे शाखा, युनिट ७ कडील सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार ऋषीकेश ताकवणे, निर्णय लांडे व नितिन धाडगे यांनी केली आहे.








