एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अकोला पोलीस दलाचा राज्यात डंका; ई-गव्हर्नन्समध्ये पटकावला तृतीय क्रमांक

अकोला पोलीस दलाचा राज्यात डंका; ई-गव्हर्नन्समध्ये पटकावला तृतीय क्रमांक

अकोला: निलकंठ वसु पाटील


महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात’ अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संपूर्ण राज्यातील ३४ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांच्या मूल्यमापनात अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाने राज्यात तृतीय क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

 

या विशेष कामगिरीबद्दल अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक आणि त्यांच्या संपूर्ण चमूला शासनस्तरावरून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
सात महत्त्वाच्या निकषांवर आधारित मूल्यमापन
शासनाने जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावरील विविध शासकीय कार्यालयांमध्ये पारदर्शकता आणि वेगवान कामासाठी हा कार्यक्रम राबवला होता. यामध्ये प्रामुख्याने खालील सात घटकांचे मूल्यमापन करण्यात आले:
* कार्यालयाचे संकेतस्थळ (Website)
* आपले सरकार प्रणाली
* ई-ऑफिस (e-Office)
* कार्यालयाचा डॅशबोर्ड
* व्हॉट्सॲप चॅटबॉट
* कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ब्लॉकचेनचा वापर
* भौगोलिक माहिती प्रणाली (GIS)
दोन टप्प्यांतील प्रक्रियेनंतर निवड
दोन टप्प्यांत करण्यात आलेल्या कडक मूल्यमापनानंतर अकोला पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याचे सिद्ध झाले आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे विशेष कौतुक केले आहे.
मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात या प्रशस्तीपत्राने अकोला पोलीस दलाचा सन्मान करण्यात आला. या यशामुळे अकोला पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link