पोलीस-समाज सुसंवाद वाढविण्यात सपोनि. वारुळे यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल : डॉ. उद्धव शिंदे
प्रतिनिधी -सारंग महाजन.
अहिल्यानगर : नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये नव्याने रुजू झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांचा स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या हस्ते शाल व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, माजी प्राचार्य एकनाथ जगताप आदी उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे हे अहिल्यानगर येथील रहिवासी असून वारूळवाडी हे त्यांचे मूळ गाव आहे. यापूर्वी ते तोफखाना पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते.
यावेळी डॉ. उद्धव शिंदे म्हणाले की, “पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सपोनि. गणेश वारुळे यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी नगर तालुक्यात उत्तम कार्य करून नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करतील, अशी अपेक्षा आहे. तसेच समाज आणि पोलीस यांच्यातील सुसंवाद वाढविणेही काळाची गरज आहे.”








