एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अकोला पोलिस दलातर्फे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ विषयक मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

अकोला पोलिस दलातर्फे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ विषयक मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

प्रतिनिधी निलकंठ वसु पाटील

अकोला (प्रतिनिधी) – अकोला पोलिस दलाच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ या महत्त्वपूर्ण कायद्याबाबत प्रशासकीय मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा दि. १२ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विजय सभागृह, पोलिस अधीक्षक कार्यालय, अकोला येथे पार पडली.

कार्यशाळेला प्रमुख उपस्थिती म्हणून पोलिस अधीक्षक श्री. अर्चित चांडक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागताने करण्यात आली. यावेळी पोलिस अधीक्षकांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अकोला पोलिस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध सेवा व योजनांची माहिती दिली. प्रोजेक्ट रक्षा अंतर्गत आतापर्यंत ८८०२ नागरिकांनी आपला अभिप्राय नोंदविला असल्याची माहिती देण्यात आली. तसेच चॅटबॉटद्वारे नागरिकांना विविध ऑनलाइन सेवांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याचे सांगण्यात आले.

कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून राज्य लोकसेवा हक्क आयोग, अमरावती विभागाचे राज्य आयुक्त डॉ. किरण जाधव (भा.पो.से. सेवानिवृत्त) उपस्थित होते. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ या कायद्याची सविस्तर माहिती देत नागरिकांना शासकीय सेवा निश्चित कालावधीत मिळाव्यात, प्रशासनात पारदर्शकता वाढावी आणि विलंब तसेच भ्रष्टाचाराला आळा बसावा हा या कायद्याचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.

नागरिकांना विविध शासकीय सेवांसाठी अर्ज करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र (CSC), संबंधित शासकीय कार्यालय तसेच ऑनलाइन आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करता येतो. या कायद्यामुळे नागरिकांना वेळेत सेवा मिळण्याची हमी मिळते तसेच सेवा न मिळाल्यास तक्रार व अपील करण्याचा अधिकार देखील मिळतो, असे मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेस राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे उपसचिव डॉ. देवेंद्र चव्हाण यांचीही उपस्थिती होती. तसेच अकोला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, विविध शाखांचे अधिकारी आणि सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यशाळेमुळे पोलिस विभागातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ बाबत सखोल माहिती मिळाली असून प्रशासन अधिक पारदर्शक व उत्तरदायी करण्यास या उपक्रमाची मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोलिस निरीक्षक (जनसंपर्क) श्री. गजानन धंदर यांनी केले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link