युनिट-५ गुन्हे शाखा पुणे शहर
खोपोली रायगड येथील खुनाच्या गुन्हयामधील आरोपीस केले जेरबंद
प्रतिनिधी रणजीत मस्के
दि.१०/०१/२०२६ रोजी काळेपडळ पोलीस स्टेशन कडील गंभीर दुखापतीच्या गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे अरबाज ऊर्फ अरमान अल्लुद्दीन शेख वय २६ वर्षे रा. आदर्शनगर उरळी देवाची पुणे याचा युनिट ५ हद्दीमध्ये शोध घेत असताना, पोलीस अमंलदार नासीर देशमुख यांना त्यांचे बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार सदर आरोपी हा आळंदी भागामध्ये येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. छगन कापसे यांनी तात्काळ युनिट-५ कडील पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार, पोलीस हवालदार तानाजी देशमुख, प्रशांत कर्णवर, अमर चव्हाण, नासिर देशमुख, गणेश माने व परमेश्वर कदम असे पथक तयार करुन तात्काळ विश्रांतवाडी आळंदी भागात रवाना केले.
नमुद आरोपीचा सदर भागात शोध घेत असता आरोपी हा विश्रातंवाडी पीएमटी बस स्टॉप येथे मिळुन आला. सदर बाबत आरोपीस ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्याचा खोपोली रायगड येथील नगरसेवीका यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येमध्ये सहभाग असल्याबाबत निष्पन्न झाले त्यांचे विरुध्द खोपोली पो. स्टे गु.र.नं ३६६भा.न्या.सं.क. १०३(१),६१(२), १८९(१),१८९ (४),१९०,१९१ (३) अन्वये गुन्हा दाखल आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक छगन कापसे, गुन्हे शाखा युनिट ०५, पुणे शहर, पोलीस उप निरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार नासिर देशमुख, तानाजी देशमुख, प्रशांत कर्णवर, अमर चव्हाण, गणेश माने आणि परमेश्वर कदम यांचे पथकाने केली.








