राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त
आरळ येथे विविध कार्यक्रम संपन्न
हिंगोली. श्रीहरी अंभोरे पाटील मराठवाडा उप संपादक
.जिल्ह्यातील वसमत तालुका अंतर्गत आरळ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय प्राथमिक शाळा आरळ केंद्र अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले .
आरळ केंद्रातील १३ शिक्षिकेला जिजाऊ पुरस्काराने केले सन्मानीत करण्यात आले या कार्यक्रमाच्या ठिकाणी वसमत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. सतिश काष्टे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. विवेक पेडगावकर साहेब तसेच विषय तज्ञ दलित वाळवंटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रि शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक, समाजक्रांतीच्या अग्रदुत क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले आणि स्वराज्याची पायाभरणी करणा-या आदर्श मातृत्वाची मुर्ती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती सोहळया निमित्त राजर्षी शाहु महाराज माध्यमिक विद्यालय आरळ येथे माता पालक मेळवा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणुन ग्रामोदय सेवाभावी संस्थेच्या सचिव तथा आमदार राजुभैय्या नवघरे यांच्या सुविद्य पत्नी सौ.वर्षाताई राजुभैय्या नवघरे व उदघाटक म्हणुन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हिंगोली येथील वरिष्ठ अधिव्याख्याता श्रीमती जयश्री आठवले मॅडम उपस्थित होत्या. यावेळी विविध प्रवक्त्यानी मार्गदर्शन केले प्रमुख अतिथी म्हणुन सौ. संगिता जाधव (शिक्षण विस्तार अधिकारी पं.स.वसमत), सौ. छाया घोडके (प्रभारी मुख्याध्यापीका केंद्रिय प्राथमिक शाळा आरळ), सौ. ऊषाताई गाईनवाड (प्रसिध्द लेखिका, अंधश्रध्दा निर्मुलन), श्री. सितारामजी सोनटक्के (नांदेड भुषन तथा योगाचार्य), मा. शकुंतला रामचंद्र बनसोडे (अध्यक्ष पंचशिल नाटय ग्रुप पुर्णा), श्रीमती कांचनताई शिंदे (महिला जिल्हाध्यक्षा, हिंगोली), सौ. संगिता देशमुख (शहर अध्यक्षा वसमत), प्रा.डॉ. सिमा चौधरी (मराठी विभाग प्रमुख शिवाजी महा. परभणी), श्री.किशन घोलप सर (केंद्र प्रमुख आरळ) उपस्थित होते. तसेच केंद्रातील ऊतकृष्ट काम करणा-या आणि जिजाऊ सावित्रीचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत यशस्वीरित्या पोहचोवणा-या शिक्षिका श्रीमती चांदणे मिरा काशिनाथराव ( जि.प.कें.प्रा.शाळा आरळ), श्रीमती रणविर शांता संभाजी (जि.प.प्रा.शाळा बळेगाव), श्रीमती रेंगे स्वाती भगवानराव (जि.प.प्रा.शाळा पिंपळगाव कुटे), श्रीमती मस्के कौशल्या प्रभाकर (जि.प.प्रा. शाळा कौडगाव), श्रीमती चव्हाण शांताबाई शेषेराव (जि.प.प्रा. शाळा चिखली), श्रीमती शेख रिजवाना रज्जाक ( जि.प.प्रा.शाळा कोनाथा), श्रीमती उदगिरे मॅडम (जि.प.प्रा.शाळा तुळजापुर वाडी), श्रीमती शिंदे वर्षा शंकरराव (जि.प.प्रा.शाळा रिधुरा), श्रीमती देशमुख आशा दादाराव (जि.प.प्रा. शाळा भारती कॅप) यांना जिजाऊ पुरस्काराने सन्मानीत केले. ऑनलाईन कार्यात पालकांचे सहाकार्य, माता पालकांची मुलांच्या अभ्यासात काय भुमिका आहे, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि आद्य शिक्षिका सावित्रीचे यासंदर्भात विचार अवगत करण्याची आवश्यकता यासंदर्भात जेष्ठ व्याख्याता जयश्रीताई आठवले यांनी महिला सक्षमिकरणाच्या अनुशंगाने आपले मार्गदर्शन केले. आरळ येथील समता सैनिक दल तसेच बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणात ऊपस्थित होत्या. तसेच एस.वाय. राऊत सर, सरंपच प्रमादे साखरे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर कातोरे, चेअरमन सुनिल कातोरे, दिलीप राखोंडे, कैलास अप्पा पंचलिंगे, कोंडीराम लोंढे, प्रभाकर गायकवाड, नारायण इंगोले, मुंजाजी कांबळे, प्रकाश गायकवाड, राजु गायकवाड, गोविदं वाटोडे, शेख गब्बर, रिधुरा सरपंच संदिप भालेराव, सुरेश नवले सर, विजय लांडगे, मिलिंद लांडगे, आशोक लांडगे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या सचिव तथा कृषी उत्पन्न बाजार समिती जवळा बाजारच्या संचालिका सौ. प्रतिभा रमेश मानवते व प्रा. रमेश मानवते यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक गणेश काळे सर, गाडेकर सर, धम्मपाल रणविर, खंदारे सर, सचिन गायकवाड, बळीराम परडे, श्रीमती प्रतिभा नरवाडे मॅडम, तुकाराम भालेराव सर, गणेश सोनटक्के, नरवाडे सर, आनंद खंदारे, विकास भंडारे, गजानन संवडकर, यांनी परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रसिध्द लेखक कवी केशन खटिंग सर, प्रास्ताविक प्रा. रमेश मानवते यांनी केले. कार्यक्रमाचे आभार किशन घोलप सर यांनी केले.









