बारामती न्यायालयात रोहित नाना बनकर यांची निर्दोष मुक्तता
प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
IPC कलम 354, 354(A)(B), 325, 294, 323, 504, 506 अंतर्गत दाखल प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. मेघराज राजेंद्र नालंदे व ॲड.ओंकार विजय इंगुले यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून रोहित बनकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
बारामती येथील मे. पुजारीसो कोर्ट यांच्या न्यायालयाने आज दिलेल्या निकालात भा.द.वी कायदा कलम 354, 354(A), 354(B), 325, 294, 323, 504 व 506 अंतर्गत चाललेल्या फौजदारी प्रकरणात आरोपी श्री. रोहित आत्माराम बनकर यांची निर्दोष मुक्तता केली.
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे फिर्यादी यांनी आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, मात्र तपासातील त्रुटी, साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, तसेच अभियोजन पक्षाकडून आरोप शंकातीत सिद्ध करण्यात अपयश आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.
यामुळे आरोपीस संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
आरोपींच्या वतीने ॲड. मेघराज राजेंद्र नालंदे व ॲड.ओंकार विजय इंगुले यांनी प्रभावी युक्तिवाद सादर करून, पुराव्यांचा अभाव, कायदेशीर त्रुटी व तथ्यात्मक विसंगती न्यायालयासमोर स्पष्ट केल्या, ज्यास न्यायालयाने आरोपीस निर्दोष सोडून मान्यता दिली.
या निकालामुळे न्यायालयीन प्रक्रियेवरील विश्वास दृढ झाला असून खोट्या व अतिशयोक्त आरोपांच्या बाबतीत कायद्याच्या कसोटीवर पुरावे किती महत्त्वाचे असतात, हे अधोरेखित झाले आहे, अशी प्रतिक्रिया बचाव पक्षाकडून व्यक्त करण्यात आली.








