गुन्हे शाखा अमरावती शहर, कडुन इसमास दोन घातक शस्त्रासह अटक.
गुन्हे शाखा अमरावती शहर यांना गुप्त माहीती मिळाली की, एक इसम हा सत्तुर व चायना चाकु घेवुन गॅलक्सी हॉटेल ते कांता नगर रोडवर गुन्हा करण्याच्या उददेशाने उभा आहे. अशा मिळालेल्या माहीती वरून मा.पो.नि.श्री. संदीप चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा येथिल पथकाने सदर इसम नामे नामे मोहम्मद अकील मोहम्मद शकिल वय २७ वर्ष रा. नाझीम किराणा जवळ लालखडी अमरावती यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन एक लोखंडी सत्तुर व एक चायना चाकु जप्त करून सदर इसमा विरूध्द पोलीस स्टेशन गाडगे नगर येथे कलम ४/२५ आर्म अॅक्ट सहकलम १३५ मपोका प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव
मोहम्मद अकील मोहम्मद शकिल वय २७ वर्ष रा. नाझीम किराणा जवळ लालखडी अमरावती.
जप्त करण्यात आलेला मुददेमाल
१) एक लोखंडी सत्तुर कि.अ.१०००/- रू
२) एक चायना चाकु कि.अ.१०००/- रू
असा एकुण कि.अ. २०००/- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला.
सदर ची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला साहेब, पोलीस उपायुक्त श्री गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त श्री. श्याम घुगे, पोलीस उपायुक्त मुख्यालय तथा गुन्हे श्री रमेश धुमाळ, श्री शिवाजी बचाटे, सपोआ गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक श्री. संदिप चव्हाण यांच्या नेतृत्वात, सपोनि महेश इंगोले, पोलीस अंमलदार गजानन ठेवले, मनोज ठोसर, मंगेश परीमल, विकास गुळथे, नईम बेग, योगेश पवार, सागर ठाकरे यांनी केली आहे.








