शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत सावित्रीबाई फुले जयंती साजरी
प्रतिनिधी स्वप्नील पाटील
पळासदळ (ता. एरंडोल) येथील शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये दि. ३ जानेवारी रोजी भारतातील पहिल्या शिक्षिका, स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या व सामाजिक परिवर्तनाच्या अग्रदूत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची संकल्पना संस्थेच्या सचिव सौ. रूपा शास्त्री यांची होती.
महाविद्यालयाच्या परंपरेनुसार सावित्रीबाईंच्या लेकींचे प्रतीक म्हणून महाविद्यालयात कार्यरत महिला प्राध्यापिका प्रा. अनिता वळवी यांना प्रतिमापूजनाचा मान देण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी होते. यावेळी प्रा. जावेद शेख, प्रा. अनुप कुलकर्णी, महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात डॉ. पराग कुलकर्णी यांनी स्त्रीशिक्षण, समाजसुधारणा व समानतेच्या लढ्यात सावित्रीबाई फुले यांचे अतुलनीय योगदान विशद केले. आजच्या पिढीने सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुप कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. दिग्विजय पाटील यांनी केले.








