“प्रामाणिक सेवेमुळेच पदोन्नतीचा सन्मान मिळतो” – डॉ. उद्धव शिंदे.
प्रतिनिधी -सारंग महाजन.
‘स्नेहबंध’तर्फे आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी सुदाम बटुळे यांचा सन्मान
अहिल्यानगर : सुदाम बटुळे यांची आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी, अहिल्यानगर म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल स्नेहबंध फौंडेशनच्या वतीने त्यांचा सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या. स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, “सातत्य, प्रामाणिकपणा आणि समाजाभिमुख कार्याची जाणीव ठेवून काम केल्यास यश निश्चित मिळते. सुदाम बटुळे यांनी आपल्या कार्यकाळात जबाबदारीने काम करत विश्वास संपादन केला असून ही पदोन्नती त्यांच्या कार्याची पावती आहे.”
या वेळी जयंत लाटे, पांडुरंग जोशी, संजय काकफळे, वृषाली घनवट, अर्चना जाधव, ऐश्वर्या ढवळीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळ :
आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल सुदाम बटुळे यांचा ‘स्नेहबंध’चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या हस्ते सन्मान.







