भाजपा’ चे कात्रज येथील ‘पहिल्या’ जनसंपर्क कार्यालयाचे लोकर्पण उत्साहात संपन्न
पुणे उप संपादक गणेश राऊत
राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब कात्रज येथील ‘पहिल्या’ भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या ‘लोकार्पण’ सोहळ्यास उपस्थित राहणार होते म्हणून, एका दिवसात लोकार्पण सोहळ्याची आणि ‘मुख्यमंत्री’ साहेबांच्या स्वागताची ‘जय्यत’ तयारी करण्यात आली. मात्र पुण्यात येण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना दोन तास विलंब झाला.
उरलेल्या अत्यंत कमी वेळेत नियोजित कार्यक्रमांमुळे कार्यक्रमास उपस्थित राहू शकत नाही, *आपण थांबू नका ‘लोकार्पण’ करून घ्या* असा साहेबांचा निरोप येताच उपस्थित ज्येष्ठ नागरिक, मार्गदर्शकांच्या हस्ते कात्रजच्या भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण उत्साहात पार पडले.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वात “शत प्रतिशत भाजपा”

हा नारा यशस्वी करण्याचा प्रयत्न अत्यंत ताकतीने भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता करत आहे. याचाच एक भाग म्हणून आमदार योगेश आण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कात्रज येथे पहिले भाजपाचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्याचा संकल्प आज ‘पुर्णत्वास’ नेण्यात आला. सर्वसामान्यांचे ‘हक्काचे’ जनसंपर्क कार्यालय असा ‘लौकिक’ सर्वांनी मिळून प्राप्त करूया असा ‘निर्धार’ यावेळी करण्यात आला.








