रायगड पोलिसांची प्रेरणा संकल्पना अभियान
एक पाऊल प्रकाशाकडे
आदिवासी मुलांनी अंधारातुन उज्वल भविष्यासाकडे वळावे या उद्देशाने रायगड पोलिस दलाकडुन प्रेरणा संकल्पना सुरू करण्यात आली.
प्रतिनिधी मुकूंद मोरे रायगड जिल्हा
प्रेरणा ‘‘एक पाउल प्रकाशाकडे ’’
पोलीस अधीक्षक रायगड यांच्या संकल्पनेतुन दिनांक 14 नोव्हेंबर पासुन सदर चळवळीची सुरूवात करण्यात आली आहे. आदिवासी समाजात पुर्वापार चालत आलेल्या अनिष्ठ रूढी, परंपरा यांपासुन सुटका करून आदिवासी मुलांनी अंधारातुन उज्वल भविष्याकडे वळावे या उद्येशाने रायगड पोलीस दलाकडुन ‘‘ प्रेरणा ’’ संकल्पना सुरू करण्यात आली.
दिनांक 14 नोव्हेंबर बाल दिनाचे औचित्य साधुन वावळोली आश्रमशाळा येथे सकाळी 10.00 ते सायंकाळी 18.00 वाजेपर्यंत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये आदिवासी समाजातील अनिष्ठ रूढी, अंधश्रद्धा, बालविवाह यांवर प्रकाश टाकण्यात आले.
पथनाट्य: – देव डान्सिंग अकॅडमी पेण चे संचालक श्री सुभाष पाटील व त्यांच्या टिमकडुन आदिवासी समाजामध्ये घडत असलेल्या घटनांवर उत्तमरित्या पथनाट्य सादर करून त्यामध्ये बालविवाहामुळे मुला-मुलींच्या आयुष्यावर कशा प्रकारे भयंकर परिणाम होतो याचे सादरीकरण केले.
वैद्यकिय अधिकारी यांचे मार्गदर्शन:- बालविवाह कायदयाने गुन्हा तर आहेच, परंतु बालविवाहामुळे मुला-मुलींना त्याचे दुष्परिणाम देखील भोगावे लागतात. जसे, प्रजनन क्षमतेवर परिणाम, गर्भपात, मातामृत्यु, कुपोषण इ. समस्या यांबाबत वैद्यकिय अधिकारी श्रीमती मालवणकर यांनी सुंदर विवेचन केले व बालविवाह का योग्य नाही याबाबत मार्गदर्शन केले.
भोंदूगीरीवर प्रकाश:- आदिवासी समाजामध्ये अजुनही काही प्रमाणात अंधश्रद्धा बाळगल्या जात आहेत, भोंदूबाबांच्या हातचलाखीला चमत्कार समजुन हा समाज आजही अंधश्रद्धेच्या जाळयात अडकुन आहे. ज्यामुळे आजारपण, विंचू दंश, सर्पदंश इ. अशा अनेक समस्यांवर उपचारासाठी हॉस्पीटल कडे न जाता अशा भोंदूबाबांकडे फिरलेजातात आणि वेळेत उपचार न मिळाल्याने जीव गमावुन बसतात. अशा भोंदूबाबांच्या हातचलाखीमागे काय शास्त्रीय कारण असतात याचे प्रत्यक्ष प्रात्याक्षिक श्री करूण हंबीर, निवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक, डॉ.होमी भाभा विज्ञान केंद्र यांनी दाखविले.
करिअर मार्गदर्शन:- करिअर निवडताना भविष्यातील लक्ष महत्वाचे असते, आपल्यातील गुण ओळखुन त्याव्दारे पुढील शिक्षण आणि करिअरची निवड कशी करावी याबाबत करिअर कौन्सिलर श्री संजय सावंत यांनी दिले.
त्याचप्रमाणे, आदिवासी समाज जन्म घेवुन आपल्या जिद्दीच्या जोरावर चांगल्या नोकरी करणारे श्री करूण हंबीर निवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक, डॉ.होमी भाभा विज्ञान केंद्र, श्री नयन वाघ, राज्यसेवा परिक्षा पास होवुन अधिकारी पदापर कार्यरत, धनाजी कु-हाडे Jr.Scintific Officer इ. यांनी आपला जीवनप्रवास विद्यार्थ्यासमक्ष मांडला.
शिवव्याख्यान:- आपल्या जीवनप्रवासाने असंख्य जनतेला प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राबद्यल प्रेरणादायी व्याख्यानाव्दारे शिवव्याख्याते श्री राजेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यामध्ये नविन चैतन्य जागवले.

प्रेरणा ’ केवळ एक उद्देश नाही तर एक चळवळ आले, ज्यामध्ये आदिवासी समाजातील मुलांच्याव्दारे या समाजाने बालविवाह, अंधश्रद्धा यांना झुगारून विकासाच्या प्रकाशाकडे वळावे, देशाचे सृजान नागरीक व्हावे व देशाच्या विकासात हातभार लावावे या श्वेत उद्येशाने रायगड पोलीसांनी रचलेली एक पायरी आहे.
सदर कार्यक्रमामध्ये पोलीस अधीक्षक रायगड श्रीमती ऑंचल दलाल तथा अन्य मान्यवर व जवळपास 900 आदिवासी समाजातील विद्यार्थी यांनी आपला सहयोग नोंदविला.
प्रेरणा उपक्रम व बालदिनाची सांगड जुळवून आदिवासी समाजील मुलांमध्ये नविन उत्साह, शिक्षण घेण्याची क्षमता, खेळ , एका उज्वल भविष्याचे स्वप्न व ते घडवुन आणण्यासाठी एक प्रेरणा या उपक्रमाव्दारे साध्य होणार आहे.









