धाड बुलढाणा पोलिसांची दमदार कामगिरी
प्रतिनिधी रवी बावस्कर बुलढाणा
पोलीस स्टेशन धाड जि. बुलडाणा हददीतील अवैद्यरीत्या दारु विक्री करणाऱ्याला केले हददपार
बुलढाणा जिल्हयात अवैद्यरीत्या दारु विक्री करणाऱ्या आरोपी विरोधात
मा. पोलीस अधिक्षक साहेब बुलडाणा यांनी प्रभावी प्रतीबंधक कार्यवाही करणेबाबत सुचना दिल्या. त्याअनुषंगाने पोलीस स्टेशन धाड हददीतील अवैध्य रित्या दारु विक्री करणारा इसम नामे सांडु विठोबा सोनुने, वय :- ४७ वर्षे, रा. तराडखेड, ता.जि. बुलढाणा याच्या विरोधात पोलीस स्टेशन धाड अंतर्गत दि. १८/०८/२०२५ रोजी कलम ५६ (१) (अ) (ब) महाराष्ट्र पोलीस अधिनीयम अन्वये हद्दपार प्रस्ताव मा. उपविभागीय दंडाधिकारी, बुलढाणा यांच्या कार्यालयात मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, बुलढाणा यांच्या मार्फतीने दाखल करण्यात आला. सदर हद्दपार प्रस्ताव अनुषंगाने मा. उपविभागीय दंडाधिकारी, बुलढाणा यांनी प्रस्तावित हद्दपार इसम यांस बाजु मांडण्यासाठी पुरेसा अवधी दिला. हद्दपार इसम याच्यावर दाखल असलेले गुन्हे आणि त्यावर करण्यात आलेली प्रतिबंधक कारवाई याचा विचार करुन, तसेच धाड परीसरात होत असलेली अवैद्य दारु विक्री आणि त्यामुळे होणारे दुष्परीणाम याची गांभीर्यता बघून, नमुद इसम सांडु विठोबा सोनुने यांस मा. उप विभागीय दंडाधिकारी, बुलढाणा यांनी बुलढाणा जिल्हयातून दि. ३१/१०/२०२५ रोजीच्या आदेशाप्रमाणे ३ महीन्याकरीता बुलढाणा जिल्हयातून तडीपार केले आहे. धाड पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामीण भागातील अवैद्दरित्या दारु विक्री करणाऱ्या इसमांवर हद्दपारीची कारवाई करण्यात येणार असून, वेळप्रसंगी आणखी कठोर कारवाई धाड पोलीस स्टेशन कडून भविष्यात केली जाणार आहे.
सदरची कार्यवाही मा. श्री. निलेश तांबे पोलीस अधीक्षक, बुलडाणा, श्री. अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक, बुलडाणा. श्री. सुधीर पाटील, उपविभागिय पोलीस अधिकारी. बुलडाणा, श्री. सुनिल अंमुलकर पो. नि. स्थागुशा, बुलडाणा, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. प्रताप दत्तात्रय भोस, ठाणेदार धाड, श्री. परमेश्वर केंद्रे पोउपनि, पोहवा १४०८ सुनिल सोनुने, पोशि १२७ नितीन माळोदे, पोशि ३६० सतिष जाधव नेमणुक पोलीस स्टेशन, धाड यांनी यशस्वी रित्या पार पाडली आहे.









