हदगाव तहसीलदार सुरेखा नांदे अखेर निलंबित
नांदेड.श्रीहारी अंभोरे पाटील
वसमत येथे तहसील कार्यालयातील शासकीय रकमेचा गैरवापर केल्याप्रकरणी तहसीलदार सुरेखा नादे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा पासुन छोडया मोड्या घडामोडी घडत गेल्या आणी तहसीलदार सुरेखा नादे ह्याचे नाव वादग्रस्त तहसीलदार म्हणून पुढे नावा रूपाला आले
वसमत वरून बदली नंतर नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे तर परत कळमनुरीत येथे सुरेखा नांदे यावर सुध्दा एका शेतकर्याने व्हिडिओ तयार करून तहसीलदार सुरेखा नांदे यांना महत्वाचे जबाबदार धरून आत्महत्या केली होती.त्या नंतर त्या प्रकरणातील चौकशी सुरू असतानाच परत त्याची हादगाव या ठिकाणी बदली होऊन त्याना हदगाव येथे तहसीलदार म्हणून पद भार स्विकारला होता काहि काळा नतर स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडूनक संदर्भात सरपंच पदासाठी आरक्षण सोडत कामात गैरप्रकार कैल्या प्रकरणी त्यांच्यावर त्या चौकशी नेमण्यात आली होती.पन कामातील आरोप यावरून नांदेड जिल्हा अधिकारी तडकाफडकी हादगाव तहसीलदार पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे.
पुढिल चौकशी समिती आदेश येईपर्यंत त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयात दैनिक उपस्थिती कामकाज करण्यासाठी नेमण्यात आले आहे.
अनु. जाती, अनु. जमाती व महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण काढताना जाणीवपूर्वक चुकीचे आरक्षण काढण्यात आल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या होत्या. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी नांदेड यांनी चौकशी अहवाल सादर करण्यास कळविले होते. त्यामुळे नांदेड अप्पर जिल्हा अधिकारी यांच्या दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजीच्या आदेशान्वये अध्यक्षतेखाली यांच्या चौकशी समिती नेमण्यात आली. समितीने हदगांव तालुक्यात दि.०१ जुलै २०२५ रोजी काढण्यात आलेले सरपंच पदाचे आरक्षण हे त्रुटीपूर्ण असून ते मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ मधील कलम ५ च्या तरतुदीशी विसंगत आहे व असे करताना त्यांनी नियमानुसार कार्यवाही केली नसल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. तसेच जिल्हाधिकारी नांदेड यांनी दि. १३.१०.२०२५ रोजी होणाऱ्या पंचायत समिती सदस्य पदाचे आरक्षण सोडतीसाठी श्रीमती सुरेखा नांदे, तहसिलदार हदगांव यांना प्राधिकृत न करता तहसिलदार हिमायतनगर यांना आदेशीत केले होते.
नांदे यांच्याबद्दल तक्रारी असल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी जिल्हा परिषदा व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी श्रीमती सुरेखा नांदे, तहसिलदार यांचेवर निवडणूकीची कोणतीही संविधानिक जबाबदारी देणे योग्य वाटत नसल्याने तसेच श्रीमती नांदे त्यांच्याविरुध्द विभागीय चौकशीची कार्यवाही करण्यात येत असल्याने त्यांना तहसिलदार हदगांव या पदावर कार्यरत ठेवणे योग्य नसल्याचे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविल्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने श्रीमती नांदे यांची तात्काळ जिल्ह्याच्या बाहेर व अकार्यकारी पदावर बदली करण्याबाबत विनंती केली.
प्रस्तुत प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेता, श्रीम. नांदे यांना सद्यःस्थितीत हदगाव तहसिलदार पदावर कार्यरत ठेवणे उचित नसल्याने त्यांना तहसिलदार हदगाव या पदावरून तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे. तसेच पदस्थापनेबाबत शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत श्रीमती नांदे यांना विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे दैनंदिन उपस्थिती नोंदविण्याबाबतही कळविण्यात यावे अशा सुचना सह सचिव मनिषा जायभाये यांनी छत्रपती संभाजी नगरचे विभागिय आयुक्तांना दिले आहेत.
सुरेखा नांदे आणि वादग्रस्त हे समिकरणच…
सुरेखा नांदे या अतिशय वादग्रस्त तहसीलदार म्हणून मराठवाड्यात सुप्रसिद्ध आहेत. वसमत येथून निलंबित झाल्यानंतर त्या नायगाव येथेही वादग्रस्त ठरल्या. वाळू घाट प्रकरणात त्यांची चौकशी झाली आणि त्यांचे दोन वेतनवाढ बंद करण्याबरोबरच विभागीय चौकशी झाली. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथेही एका आत्महत्या प्रकरणाचख फटका त्यांना बसला. तीन महिण्यानंतरही त्या पुन्हा हदगावला रूजू झाल्या पण वादग्रस्त हा शिक्का इथेही लागला.








