अकोला पोलिसांचा जनतेला थेट संदेश “लाच मागणाऱ्यांना अजिबात संधी देऊ नका!”
अकोला | जिल्ह्यातील नागरिकांना पोलीस अधीक्षक, अकोला यांनी स्पष्ट आवाहन केलं आहे — “कोणीही पोलीस अधीक्षक कार्यालयातील कामासाठी पैशांची मागणी करत असेल, तर अशांना अजिबात संधी देऊ नका!”
नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की, जर अशा प्रकारची मागणी होत असेल तर तुम्ही दररोज संध्याकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत थेट SP अकोला कार्यालयात भेट देऊन माहिती द्यावी.
पोलीस प्रशासनाचा उद्देश पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा टिकवण्याचा असून, नागरिकांच्या सहकार्यानेच भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई यशस्वी होऊ शकते, असा संदेश पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.
“भ्रष्टाचार थांबवायचा असेल, तर तुमचा आवाज महत्त्वाचा आहे. एकत्र येऊन प्रामाणिक प्रशासनासाठी पुढे चला!”
तसेच, तुमच्या परिसरातील भ्रष्टाचार, गुन्हे किंवा सामाजिक समस्या यासंदर्भातील माहिती व्हॉट्सअॅप क्रमांक 7820899963 वर पाठवता येईल.








