वाहतूक विभाग, स्वारगेट पुणे
संपादक संतोष लांडे
पोलीस उप आयुक्त कार्यालय (वाहतूक), पुणे शहर
दिनांक : 03/11/2025
स्वारगेट चौक परिसरात आज वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे रिक्षाचालक व इतर वाहनचालकांवर धडक मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईत एकूण 324 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली
– प्रमुख उल्लंघन व कारवाई
🚦 उल्लंघन 🔢 संख्या
🚫 सिग्नल जम्पिंग 46
⛔ अनाधिकृत पार्किंग 2
👕 गणवेशात नसणे (रिक्षाचालक) 78
↩️ नो एंट्री मधून वाहन चालविणे 10
🚖❌ भाडे नाकारणे 48
👥 जास्त प्रवासी नेणे 97
🛑 पोलीस इशारा न पाळणे 16
📄 आवश्यक कागदपत्रे नसणे 5
🔢 फॅन्सी नंबर प्लेट 5
—
👮♂️ ही कारवाई स पो नि क्षीरसागर व स्वारगेट वाहतूक शाखा पथकामार्फत करण्यात आली.
📢 नागरिकांना आवाहन
पुणे वाहतूक पोलीस सर्व नागरिकांना आवाहन करतात की,
✅ वाहतूक नियमांचे पालन करा
✅ पोलीस प्रशासनास सहकार्य करा
✅ सुरक्षित व सुयोग्य वाहतूक व्यवस्थेस हातभार लावा
🚘💡 सुरक्षित वाहनचालक – सुरक्षित शहर









