“जब्राट” चित्रपटातील एक सपोर्टींग कलाकार श्री अनिल ढगे यांचा आज जन्म दिवस.
प्रतिनिधी मुकूंद मोरे
जब्राट टिम तर्फे Anil Dhage. यांना “जन्म दिवसाच्या हार्दिक सदिच्छा”
श्री अनिल ढगे यांच्यासोबत मी खूप नाती शेअर करते, त्यातली काही इथे देते. जसं की, यांचं कुटुंबीय, जवळचे नातेवाईक हे लहानपणापासून धाराशिवच्या आमच्या गल्लीतले. त्यामुळे त्या नात्याने यांचं आणि माझं नातं गल्लीवाले.
मी त्यांना म्हणताना भाऊ म्हणते… कारण त्यांच्या लहान बहिणी आणि आम्ही लहानपणी एकत्र वेळ घालवलेला आहे. त्या नात्याने ते माझे भाऊ.
अशी अनेक नाती आहेत. आणि आता जब्राट मध्ये असिटिंग केल्याने, “जब्राट” परिवाराचा सदस्य या नात्याने हे एक नवीन नातं बनलंय…
आणि सगळ्यात वेगळं आणि आजवर जगाला माहीत नसलेलं नातं म्हणजे, ते माझे ‘गुरुजी’ सुद्धा आहेत.
मला पूर्वी संगीताचा “सरगम” सुद्धा माहीत नव्हता. पण आज मला संगीताची भाषा समजते. अर्थात माझ्या असंगीतकारासोबत राहून बराच काही ज्ञानात भर पडत होती. पण काय चाललंय, कसा चाललंय याबद्दल कळण्याचं जे मुळ ज्ञान लागतं ते या गुरुजींकडून मिळालं. त्यामुळे जेंव्हा संगीताबद्दल काही शिकते तेंव्हा मी अनिल भाऊंना ‘गुरुजी’ म्हणते. मी अमेरिकेत, गुरुजी भारतात. तरीही माझी शिकवणी चालू होती.
अनिल भाऊंकडे पाहून कोणालाही त्यांच्या वयाचा अंदाज येणार नाही कारण त्यांचा उत्साह, त्यांची एनर्जी ही तरुणाला लाजवेल अशीच आहे…
ते स्वात: उत्तम तबला वाजवतात. लहानपणी दत्त जयंतीच्या आदल्यादिवशी घरी भजन असायचं त्यावेळी तबला वाजवायला भाऊ घरी यायचे. अशा अनेक बाबींनी जुडलेले आमचे ऋणानुबंध आहेत. आणि त्यात रेखा वहिणीच्या नात्याची भर पडलीय.
लिहायला खूप आहे पण आज नेमकी घाईची वेळ आली.
एक महत्वाची बाब म्हणजे आपल्या जब्राट मध्ये त्यांनी मराठी जेष्ठ अभिनेते ‘श्री संजय मोने’ यांच्यासोबत स्क्रीन शेअर केला आहे..










