नागपूर हादरले, 12 वर्षाच्या मुलीला लॉजवर नेवुन सामूहिक बलात्कार… नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद,
फलटणनंतर आता नागपूर हादरले, नागपूरांत 12 वर्षाच्या मुलीवर लॉजवर बलात्कार, दोन आरोपींवर गुन्हा दाखल, नागपूर जिल्हा प्रतिनिधी. नागपूरमध्ये अल्पवयीन 12 वर्षाच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नंदनदन पोलिसांनी आरोपी नामे. ( करण आणि रोहित ) या दोघांना अटक केली असून. या घटनेमुळे नागपुरांत संतापाची लाट निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्यानंतर राज्यांतील वातावरण ढवळून निघाला आहे. अशातच नागपूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. इयत्ता सहावीत शिकणाऱ्या 12 वर्षीय मुलीला लॉजवर नेवुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपी विरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नराधमाने बलात्कार करताना चे व्हिडिओ चित्रित करून चिमुकलीला धमकवल्याची माहिती समोर आहे. नागपूरच्या भिलगांव परिसरांत गुरुवारी ही खळबळ जनक घटना समोर आली.12 वर्षाच्या मुलीला येथील लॉजवर घेवुन गेले त्यानंतर या दोघांनी तिच्यावर अमानुषपणे बलात्कार केला. याप्रकरणी चिमुकलीने घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला असता पिडितेच्या पालकांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले, पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही नराधमांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी नामे. (करण आणि रोहित ) दोघेही गुन्हेगार क्षेत्रातील असून. या पूर्वीही त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत मात्र 12 वर्षाची मुलगी लॉजवर गेली कशी? आणि लॉज मालकांनी परवानगी दिली कशी? या प्रश्नांची उत्तरे अद्यापही समोर आलेली नाहीत या दोन्ही आरोपीं सोबत लॉज मालकालाही सुद्धा शिक्षा होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.









