शेत आखाड्यावर झालेल्या हल्ल्यात एक युवक ठार.
शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : दि 23 ऑक्टो.रोजीच्या मध्यरात्री दोन ते तीन अज्ञात आरोपींनी बोरी रोडवरील वालुर शेत शिवारातील आसाराम रानबा सोनवणे यांच्या आखाड्या वर हल्ला करून तेथे झोपलेला फिर्यादीचा मुलगा संतोष आसाराम सोनवणे ( २४ ) यास गजासारख्या हत्याराने डोक्यात व मानेवर मारून ठार केले .व सोन्याचे दागिने व रोख असा एकूण ३०,५००/- रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. दिवसभर शेतात काम करून सर्व कुटूंबीय झोपले असता रात्री १ च्या सुमारास चड्डी बनियन घातलेल्या दोन ते तीन अज्ञात चोरट्यांनी सदरील प्रकार केला .संतोष ला जीवे मारल्यानंतर त्याची आई वछलाबाई हिचे अंगावरील सोन्याचे दागिने व नगदी रुपये जबरीने चोरून नेले .सदर शेता जवळ असलेल्या कृष्ण मंदिरातील दत्तात्रय भोकरे व सरुबाई भोकरे यांना देखील मारहाण करून जखमी केले. आसाराम सोनवणे यांच्या फिर्यादीवरून दोन ते तीन अज्ञात आरोपीच्या विरोधात कलम 103(1),311,309(6),3 (5) BNS नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे . पोलीस मिरीक्षक दीपक बोरसे पुढील तपास करीत आहेत . पोलीस अधीक्षक रविंद्रसिह परदेशी ,पोलीस उपविभागीय अधिकारी श्री बेनिवाल,दिपककुमार वाघमारे स्थानिक गुन्हा शाखेचे विवेक पाटील यांनी भेट देऊन तपासा बाबत सूचना दिल्या आहेत .








