अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
दिवाळी आनंदाची भेट घेऊन स्नेहाची
जितुर . रामेश्वर हालगे
परभणी जिल्ह्यातील जितुर येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे जितुर येथील गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले साहेब यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या वेळी
मा. गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले
साहेब यांच्या संकल्पनेतून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय व RMSA वस्तीगृह च्या निराधार , दुर्बल, व वंचित गटातील गरजू बालिकांना मनपसंत ड्रेस वितरणाचा कार्यक्रम व “मराठी अभिजात भाषा सप्ताह ” निमित्ताने ‘ बालकवी संमेलन’ व ‘ काव्यानंद’ कार्यक्रम दिनांक 14 ऑक्टो 25 रोजी घेण्यात आला .
या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी व विशेष मार्गदर्शक श्रीमती सविता बिरगे मॅडम ( शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद परभणी) यांची असून कार्यक्रमाचे उद्घाटन व दीपप्रज्वलन पालक मंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांचे निकट वर्तीय असलेले श्री शिवाजी कदम बोर्डीकर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री के.सी.घुगे यांनी केले आणि मार्गदर्शक म्हणून श्री नारायण मुंढे व आर. आर. कातकडे यांची तसेच तालुक्यातील केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक,शिक्षक , व इ .कर्मचारी यांची उपस्तिथी लाभली होती. कार्यक्रमाचे अत्यंत नियोजन बद्ध व छान असे सूत्र संचालन श्री मयूर सर यांनी केले आणि कार्यक्रमाचा समारोप व आभार श्री रामेश्वर हलगे सर यांनी केले..
या कार्यक्रमाला मोलाचे योगदान देणारे चव्हाण कलेक्शन व स्वरूप साडी सेंटर चे मालक चव्हाण जी यांचे व राधाकृष्ण मंगल कार्यालय मालक आदमाने जी यांचे लाभले तसेच तालुक्यातही केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांचेही योगदान या कार्यक्रमात असल्यामुळे या सर्वांच्या योगदानामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला असून त्यांचे आभार व धन्यवाद मा. गटशिक्षणाधिकारी पोले साहेब व्यक्त केले व अश्याच दानशूर व्यक्तीमुळे विद्यार्थांचा, समाजाचा विकास होण्यास मदत होत असतो असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय व जिल्हा परिषद शाळांच्या मुलींनी वेगवेगळे नृत्य सादर केले, काहींनी कविता सादर केल्या त्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत आनंद दाई वातावरणात पार पडला असून त्यात निराधार, दुर्बल ,वंचित गटातील बालकांच्या चेहऱ्यावर अन्नदामुळे तो आनंद द्विगुण झाल्याचे दिसून आले.









