तेल्हारा तालुक्यात देशी दारूची अवैध घरपोच विक्री वाढली; प्रशासन डोळेझाक करत असल्याची चर्चा — लवकर कारवाई न झाल्यास परवाने रद्द होण्याची शक्यता
अकोट प्रतिनिधी :-नीलकंठ वसू 7820899963
तेल्हारा तालुका ग्रामीण भागात परवाना धारक देशी दारू दुकानांमधून दररोज शंभरहून अधिक पेट्या विकल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे. या दुकानांमधील काही अवैधपणे ग्रामीण भागात घरपोच दारू विक्री करून कायद्याचा खुला भंग करत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित प्रशासनातील काही अधिकारी चिरीमिरी घेऊन या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात तरुणाईत दारूचे व्यसन वाढत असून, याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या गंभीर विषयाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तत्काळ लक्ष देणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. “अवैध दारू विक्रेते आमचे कोणी काही करू शकत नाही” या तोऱ्यात काही विक्रेते मोकळेपणाने वावरत असल्याचेही समजते.
जर प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर हे प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचवून संबंधित देशी दारू दुकानांचे परवाने रद्द करण्याची कारवाई होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, अकोट तालुक्यात भाई रजनीकांत महाराष्ट्र दारुमुक्ती संयोजक यांच्या मार्गदर्शनाखाली वैध अवैध दारूमुक्ती मोहीम सुरू असून, हीच मोहीम लवकरच तेल्हारा ग्रामीण भागातील देशी दारू दुकानांपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती मिळाली आहे.
हीच बाब संबंधित अधिकाऱ्यांसाठी इशारा म्हणून समजावी, अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे.








