अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
रामदास आठवले साहेबांचा मराठवाडा दौरा शेतकऱ्यांच्या दुःखाला दिला आवाज
प्रतिनिधी संगीता इनकर
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदासजी आठवले साहेब मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या. मराठवाडा विभागात सध्या पुरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आठवले साहेबांनी शेतकऱ्यांना धीर देत त्यांना शक्य त्या सर्व मदतीचे आश्वासन दिले. त्यांनी जाहीर केले की केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई दिली जाईल, यासाठी ते स्वतः प्रयत्नशील राहतील.
त्यांनी प्रशासनाला देखील सूचना दिल्या की नुकसानग्रस्त भागाचा तातडीने आढावा घेऊन मदतीसाठी आवश्यक ती पावले त्वरित उचलावीत. शेतकऱ्यांचे दुःख केवळ त्यांचे नसून संपूर्ण देशाचे आहे, असे सांगत आठवले साहेबांनी आपली सहवेदना व्यक्त केली आणि सरकारकडून लवकरच ठोस मदत पोहोचेल, असा विश्वास शेतकऱ्यांना दिला.









