डॉ अण्णाभाऊ साठे चा पुतळा बसविण्याची अनेक वर्षाची मागणी
मुख्यमंत्र्यापासुन केद्रिय मंत्री राज्यमंत्री अधिकार्याला दिले
निवेदन लहुजी विद्रोही सेना जिलाध्यक्ष रुपेश अवचार
खामगांव खामगांव शहरात अनेक थोर महापुरुषाचे पुतळे आहेत ज्यांनी लोकहिताचे समाजकल्यानाचे कार्य केले आहे जे आम्हा सर्वासाठी प्रेरणादायी आहेत अशाच या शहरात असलेल्या पुतळ्यामध्ये साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व्हावा अशी अनेक वर्षापासुनची मागणी हि राहिली आहे डॉ अण्णाभाऊ साठेचे साहित्य प्रबोधनात्मक असुन अमुल्य असे आहे लोकहितासाठी त्यांच्या कल्याणासाठी लिखान करणारे तसेच कामगारासाठी लढा देणारे त्यांगी तपस्वी डॉ अण्णाभाऊ साठे हे साहित्यीक क्षेत्रातील अनमोल असे रत्न आहेत त्यांचे साहित्य प्रेरणा देणारे आहे यामुळे साहित्य रत्न लोकशाहिर डॉ अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा खामगांव शहरात असणे म्हणजे येता जाता तो पुतळा आम्हा सर्वाना प्रेरणा देत राहिल म्हणून नगर परिषद जवळील चौक परीसरात साहित्य रत्न लोकशाहिर डॉ अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात यावा व त्या चौकाचे कायदशीरीत्या नामकरण करण्यात यावे या अगोदर हि आपणास शासन दरबारी अनेक निवेदन दिलेले आहे परंतु काहिच कार्यवाही झालेली नाही तरी मागणीची दखल घेऊन साहित्य रत्न लोकशाहिर डॉ अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवावा अशी मागणी लहुजी विद्रोही सेनेच्या वतीने जिलाध्यक्ष रुपेश भाऊ अवचार यांनी केली आहे या मागणीला अनेकांचा सुध्दा पाठिंबा सुध्दा आहे








