जळगांव हादरले, फेसबुक वरून झाली ओळख जळगांवत पोलिसांने केला महिलेवर अनेक वर्ष अत्याचार… पत्नी आईवरही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!
प्रियांका देशमुख जळगांव जिल्हा प्रतिनिधी
सोशलमीडिया फेसबुक वरून झालेल्या ओळखीनंतर अविवाहित असल्याचे भासवून मूळच्या पोलीस पश्चिम बंगालच्या 31 वर्षीय तरुणीवर शहरांतील विविध लॉजवर तब्बल 2021 ते 2025 दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रावेरात पोलीस ठाणेत कार्यरत असणारे पोलीस कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि आई विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळच्या पश्चिम बंगालच्या रहिवासी असलेल्या 31 वर्षीय पीडित महिलेशी संशयित जळगांव जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी नितीन कमलाकर सपकाळे (वय 32) याची 2017 मध्ये फेसबुकद्वारे ओळख झाली होती. सपकाळे यांनी आपण अविवाहित असल्याचे भासवून तिच्याशी मैत्री केली आणि लग्नाचे आमिष दाखवले, या आश्वासनावर विश्वांस ठेवून पीडित महिला अनेकदा कोलकत्यातून जळगांवला आली होती. या काळात पोलीस कर्मचारी नितीन सपकाळे यांने तिच्यावर विविध लॉज मध्ये नेवुन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. 2020 मध्ये पीडित महिलेला नितीन हा विवाहित असून त्याला एक मुलगी असल्याचे समजले तरीही नितीनने तिला मी पत्नीला घटस्फोट देणार असल्याचे सांगितले होते. मात्र 2021 ते 2025 या काळात त्यांनी वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला. अखेर पोलीस कर्मचारी नितीन सपकाळे यांने पीडित महिलेला लग्नास नकार दिला. यावेळी आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर पीडित महिलेने वकिलाच्या मदतीने (23 सप्टेंबर ) रोजी जळगांव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी नितीन सपकाळे व त्याची पत्नी,आई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सागर शिंपी करीत आहेत.








