सिम्बॉल ऑफ नॉलेज फाऊंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या संविधान जनजागृती स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
निफाड भारतीय संविधान हे जगातील सर्वात विस्तृत, मोठे आणि नागरिकांना व्यापक अधिकार देणारे आहे. संविधान आपल्या देशाचा सर्वोच्च कायदा असून त्याचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे.भारतीयांचे सर्व जीवनमान संविधानाने नियंत्रित केलेले आहे. नागरिकांचे मूलभूत अधिकार, राज्याने करावयाची कामे.कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ न्याय मंडळ आदीबाबत कायदे संविधानात अंतर्भूत केलेले आहेत. प्रत्येकाचा विचार संविधान निर्मात्यांनी केला आहे. प्रत्येकाने संविधान समजून घेऊन संविधानानुसार वर्तन करणे हे आद्य कर्तव्य आहे. असे मत राज्यशास्त्रचे अभ्यासक प्रा डॉ ज्ञानोबा ढगे यांनी व्यक्त केले.
निफाड येथील सिम्बॉल ऑफ नॉलेज या बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संविधान जनजागृती स्पर्धा संपन्न झाल्या त्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ निफाड येथे संपन्न झाला
यावेळी त्यांनी वरील प्रतिपादन केले
यावेळी व्यासपीठावर प्रा ज्ञानोबा ढगे, मोहन आढागळे,,सिम्बॉल ऑफ नॉलेज चे संस्थापक अध्यक्ष राकेश निकाळे,उपाध्यक्ष
दादाराव काउतकर , खजिनदार विनोद गायकवाड,ॲड.राहुल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते
सिम्बॉल ऑफ नॉलेज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राकेश निकाळे यांनी फाउंडेशनचा उद्देश स्पष्ट करताना फाउंडेशन राबवीत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली ही संस्था विविध समाजउपयोगी विविध उपक्रम राबवणार आहे असे त्यांनी सांगितले.,मोहन आढागळे यांनी मनोगत व्यक्त केले
या फाउंडेशनच्या वतीने विविध शाळा,महाविद्यालयात राबविलेल्या भारतीय संविधान जनजागृती अभियान स्पर्धेत ८० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वयानुसार दोन गट पाडण्यात आले प्रत्येक गटांमध्ये ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला ,या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
मोठा गट- प्रथम आरती शिवाजी कोटमे ,द्वितीय -तेजस्विनी मोहन गडाख ,तृतीय -रमेश अशोक खटके
छोटा गट -प्रथम -साई मंगेश भन्साळी ,द्वितीय -अदिती गणेश देवकर ‘तृतीय -करण खंडेराव गायकवाड
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राकेश निकाळे, उपाध्यक्ष दादाराव काऊतकर, सचिव प्रेम वाघ, खजिनदार विनोद गायकवाड , सल्लागार -अँड. राहुल गायकवाड, सहसचिव प्रवीण कोळी, सदस्य सुनील साळवे, दादाराव पंडित, राहुल उन्हवणे, विक्रम आढाव यांनी परिश्रम घेतले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल उन्हवने यांनी केले तर आभार राकेश निकाळे यांनी मानले.








