महाराष्ट्रातील न प आणि मनपा सेवानिवृत्त शिक्षक संघटना स्थापन
प्रमोद देशमुख यांची अध्यक्षपदी निवड
प्रतिनिधी सतीश कडू
नागपूर : महाराष्ट्रातील नगर परिषद, नगर पंचायती आणि महानगर पालिका मधून सेवानिवृत्त होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांच्या समस्या सुद्धा वाढलेल्या आहे. या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र संघटना असणे ही काळाची गरज ओळखून संपूर्ण महाराष्ट्रातील सेवानिवृत्त शिक्षक नागपूर येथे अध्यापक भवनाला जमा होऊन सकारात्मक विचाराने संघटना निर्मिती केली. यासभे दरम्यान अनेक शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात सर्वानुमते संघटनेचे अध्यक्ष म्हणून प्रमोद देशमुख यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष यशवंत वंजारी, पुंजाराम नेमाडे, मो फजले वहीद खान, सादिक शेख कार्याध्यक्ष म्हणून संजय रेवतकर, कैलास पराते कोषध्यक्ष म्हणून उत्तम मानकर मार्गदर्शक मधुकर लांजेवार आणि नरेंद्र चौधरी तसेच संघटक उमाशंकर शर्मा, भगवान जनबंधू, युवराज मेश्राम, रियाज शेख सहसचिव कैलास गर्गेलवार, तुकाराम करामोरे तर सदस्य म्हणून अशोक लोणकर, पुष्पा तुपे, राजेंद्र मातेरे, कल्पना नेताम, मांगो लोंढे अशा एकूण 22 पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. उपस्थित सर्व शिक्षकांनी पदाधिकारी यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे संचालन केशव रामटेके यांनी तर आभार उत्तम मानकर यांनी मानले.








