ओला दुष्काळ व कर्जमाफी साठी 26 रोजी राष्ट्रीय महामार्गा पागरा पाटीवर रस्ता रोको
प्रतिनिधी श्रीहारी अंभोरे पाटील
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील खांडेगाव सर्कल अंतर्गत शेतकरी बांधवांच्या वतीने दिनांक 26 सप्टेंबर रोजी सतीपांग्रारा पाटीवर शेतकर्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सत्तच्या पावसामुळे शेतकर्याचे शेतातील पीक संपुर्ण नास झाले आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या समोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यासाठी शासनाने त्वरित निर्णय घेऊन वसमत तालुक्यातील ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी 50000 हजार आर्थिक मदत जाहीर करावी व सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी करून पिक विम्याची आर्थिक मदत त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी या संदर्भात मागणी व गेल्या अनेक दिवसापासून वसमत ते अकोली रस्त्यावरील अकोली व सतीपांगरा आधी ठिकाणच्या गावालगत असलेल्या रहदारीच्या ठिकाणावरील पूलाची मोठी नुकसान झाली आहे त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत आहे सदर पुलाची दुरुस्ती करणे बाबत यापूर्वी अनेक निवेदने दिली सदर पुलामुळे दोन व्यक्तीचे जीव गेले तरी शासनाला जाग आली नाही व यानंतर किती लोकांचे जीव घेणार आहेत यासाठी त्वरित रस्त्यावरील फुलांची दुरुस्ती करून देण्यात यावी . यावर्षी सर्कलमधील अकोली रांजणा थोरावा पांगरा असती खांडेगाव येथील काही घरांची पडझड झाली आहे व कुटुंब बेघर झाले आहेत त्यामुळे अशा कुटुंबाचे नुकसानीचे पंचनामे करून त्यांना आर्थिक अतिरिक्त मदत देण्यात यावीयासाठी दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11: वा.रोजी सतीपांगरा पाटीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येनार आहे या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
*अनिल कदम* , शिवसेना उप जिल्हाप्रमुख श्याम कदम*, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष तथा सरपंच पांगरा सती गोविंदराव ढेंबरे, माजी सरपंच खांडेगाव नवनाथ रवंदळे, सरपंच थोरावा गजानन कदम अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा अकोली ग्रामपंचायत सदस्य अजय कदम अकोली ग्रामपंचायत सदस्य
राजू सरडे सरपंच पळसगाव,पारवा
*राम साळवे, रांजोना सरपंच
बालाजी काकडे , माजी सरपंच रोडगा फाटा तुकाराम साळवे सर्कल प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खांडेगाव
बंडू राबळे,माधव कुसळे, गोपीनाथ जाधव, व समस्त खांडेगाव सर्कल शेतकरी









