अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
परराज्यातुन येवुन केबल चोरी करणा-या टोळीला चतुरशृंगी पोलिसांनी केली अटक
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
पुणे :चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दि. १७/०९/२०२५ रोजी सायंकाळी १७:३० वा ते दि.१८/०९/२०२५ रोजी सकाळी १०:३० वा.च्या दरम्यान परिहार बौक औंध पुणे येथील चेंबरमधुन बी.एस.एन.एल ऑफीसची अंन्डर ग्राऊंन्ड असेलली फिनोलॅक्स कंपनीची २०० मिटर लांबीची काळ्या रंगाची व त्यामध्ये कॉपर असलेली केबल ही कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरी करुन नेली, म्हणुन फिर्वादी यांनी दिली तक्रारीवरुन गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयाचा पुढील तपास हा वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार करीत असताना यातील आरोपीची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेवुन शोध घेत असताना यातील आरोपी हे संगमवाडी पुणे येथे असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्यांचा शोध घेवुन आरोपी नाव १) नसरुल बिलाल मोहम्मद, वय २३ वर्ष. रा.१५७ हरिजन कॅम्प मंडावली फाजलपुर, लक्ष्मी नगर, नवी दिल्ली २) संजीव कुमार श्रीसेवाराम वर्मा, वय ३०० वर्ष, रा. साऊथ गणेशनगर नवी दिल्ली ३) फईम अहमद शरीफ अहमद शेख, वय ४२ वर्ष, रा. कलवड नस्ती, लोहगाव पुणे ४) नारीस फकीर मोहम्मद, तग ३५ वर्ष, रा. हरिजन कॅम्प मंडावली, फाजलपुर लक्ष्मी नगर, नवी दिल्ली यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या कडे अधिक तपास केला असता त्यांनी दाखल गुन्हा हा त्यांने इतर दोन साथीदार यांच्या सह केल्याचा कबुली दिल्याने नमुद आरोपी यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांच्या कडुन गुन्हा करताना बापरलेला एक टेम्पो, एक रिक्षा, एक क्रेन व चोरीस गेला मुददेमाल त्यासोबत महानगर पालीकेचे गजुर वापर असलेले हेल्मेट, रिफलेक्टींग जॅकेट, लाईट बॅटन, बॅरीकेटस, हातोडा, करवत, पहार, लोखंडी सत्तुर व इतर वस्तु असा एकुण २९,३५,७५०/-रु. किं. चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा सहा. पोलीस निरीक्षक पोटे हे करीत आहेत.
तसेच सदरची कामगिरी ही मा अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४ पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, खडक विभाग पुणे शहर श्री. विठठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती आश्विनी ननावरे यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी, सहा. पोलीस निरीक्षक पोटे, पोलीस अंमलदार श्रीधर शिर्के, इरफान मोमीन, श्रीकांत वाधवले, बाबुलाल तांदळे, बाबासाहेब दांगडे, नाघेश कांबळे न तुषार गिरंगे गांनी केली आहे.








