अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
थेपडे म्हसावद विद्यालयाचे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
स्वा. सै. प. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद जि. जळगाव येथील तालुकास्तरीय 17वर्षीय आतील बुद्धिबळ स्पर्धेत इ.10 वी अ ची विद्यार्थीनी *कु. गौरी प्रदीप चौधरी* हिने तालुकास्तरावर विजय मिळवून तिची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संस्थेचे चेअरमन डॉ. केदारजी थेपडे साहेब, शाळेचे मुख्याध्यापक श्री. पी. डी.चौधरी सर, उपमुख्याध्यापक श्री. जी डी बच्छाव सर, पर्यवेक्षक के पी पाटील सर, शिक्षक प्रतिनिधी श्री सचिन चव्हाण सर तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी यशस्वी विद्यार्थिनीचे व क्रीडा शिक्षक श्री राहुल गिरासे सर यांचे हार्दिक अभिनंदन केलेले आहे आणि कु. गौरी प्रदीप चौधरी हिला जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सोबत मार्गदर्शक क्रीडाशिक्षक श्री राहुलसिंग गिरासे सर होते.








