अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
विश्रामबाग पोलीस स्टेशन, पुणे शहर
गणपती मध्ये गर्दीचा फायदा घेवुन रिक्षा चोरणा-या आरोपीस विश्राम बाग पोलिसांनी केली अटक.
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
पुणे:विश्रामबाग पोलीस ठाणे गुरनं २०४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३, कलम ३०३(२) अन्वये दाखल गुन्हयातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, दि.३१/०८/२०२५ रोजी रात्रौ २२:०० ते दि. ०१/०९/२०२५ रोजी रात्री ०१:०० वाजता दरम्यान शनिवार वाडा आऊट गेट शेजारील फुटपाथच्या लगत पुणे येथे त्यांची रिक्षा त्यांनी लॉक व पार्क करुन ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादीच्या संमतीशिवाय व लबाडीच्या इरादयाने चोरुन नेली म्हणुन फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने गुन्हा नोंद आहे. दाखल गुन्हयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर व पोलीस अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते.
दाखल गुन्हयाच्या तपासात विश्रामबाग पोलीस ठाणे तपास पथकातील अंमलदार राहुल मोरे यांनी तांत्रीक विश्लेषण व गोपणीय खबरीच्या मदतीने सदरचा गुन्हा हा सिध्दाराम तुकाराम शिंदे वय ३० वर्षे, रा. गंधर्व बिल्डींग समोर, ससाणे नगर हडपसर, पुणे, मुळ पत्ता लक्ष्मी मार्केट, विजापुर वेस येथे मार्कड मंदिर जवळ, दक्षिण सोलापुर याने केल्याचे निष्पन्न करुन त्यास सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर व स्टाफ यांच्या मदतीने बाजीराव रोड येथुन ताब्यात घेवुन ७५,०००/- रु.किं.ची बजाज कंपनीची काळया पिवळ्या रंगाची अॅटो रिक्षा तिचा आरटीओ नंबर एम एच १४ एच एम ०२७१ असुन ती जप्त करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई मा.अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परि-०१ श्री. कृषीकेश रावले, मा. सहा. पोलीस आयुक्त, श्री. साईनाथ ठोंबरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहर श्रीमती विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे), अरुण घोडके तसेच सहा.पो.निरी. राजेश उसगावकर, पोलीस अंमलदार गणेश काठे, अमोल भोसले, राहुल मोरे, आशिष खरात, अनिष शेख, अर्जुन थोरात, नितीन बाबर, सागर मोरे व शिवा गायकवाड यांनी केलेली आहे.








