आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर काही नियमित कर्मचाऱ्यांचा त्रास का?
नियमित कर्मचाऱ्यां सारखेच करतात कंत्राटी कर्मचारी काम.
समान काम समान वेतन लागू करण्यात यावा.
आबिटकरच्या प्रकाशात आश्वासनाने समन्वयक झाले गहाण?
प्रतिनिधी: गोपाळ भालेराव
नागपूर :- दि. 13/ 9/2025:- महाराष्ट्र राज्यातील
आरोग्य विभागातील हजारो अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप २३ दिवसांनंतर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आला. परंतु प्रकाश आबिटकर यांनी बैठकीत देण्यात आलेले आश्वासनाचे वेळकाढूपणाचे पेढेच…..दिले आहेत का अशी शंका सर्वत्र व्यक्त केली जात आहे. कारण… यापुर्वी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजीत पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार , धर्मरावबाबा आत्राम यांच्या सह अनेक आजी — माजी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आमदार , खासदारांनी, विरोधी पक्षनेत्यांनी शेकडो वेळा आशा पल्लवित करण्यासाठी फक्त आश्वासने दिली. परंतु मागील एका दशकाहून अधिक वर्षे पूर्ण झाले तरी आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आले नाही. तर यापूर्वी ज्या….संघटना कार्यान्वित होत्या. त्या..,.. संघटनेच्या वतीने समन्वयकांच्या माध्यमातून एक रुपयाच्या नावाखाली एकेक लाख रुपये जमा करून आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली. त्यानंतर फुलांची भाषा सुरू झाली. गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातील आरोग्य कंत्राटी कर्मचारी बळी पडले. त्यामुळे वरिष्ठ समन्वयकांनी आता तरी शासनाच्या केवळ आश्वासनाने येडे होऊ नये.
(एनएचएम) कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप बुधवारी अखेर मागे घेण्यात आला. मात्र दुसऱ्या दिवशी रूजू होतांना आणि रुजू झाल्या नंतर नियमित काम करणाऱ्या अधिपरिचारिकेने उलट.. सुलट बोलुन मानसिक त्रास दिल्याची चर्चा गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी उपजिल्हा रुग्णालय परिसरात ऐकावयास मिळाली. ” अजून ईकडे आल्याचन्.. … जा मी नाही करून घेत रुजू. तुमचे तुम्ही पाहात बसा, मला काही देणे.. घेणे नाही, ” अशा शब्दांत बोलुन अगदी सकाळी ७-३० ला ड्युटीवर आलेल्या कंत्राटी आरोग्य सेविकांना एका इंचार्ज अधिपरिचारिका सेविकेने सकाळी…… सकाळीच अपमानित केले असल्याची चर्चा आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर बुधवारी अखेर मागे घेण्यात आला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार याविषयी सकारात्मक राहतात की नाही या बाबत शंका…. कुशंका असल्याचीही चर्चा सुरू आहे. संघटनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन १३ पैकी १० मागण्यांना तत्वतः मान्यता दिली. याबाबतचे लेखी पत्र राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्त केले आहे. मात्र महाराष्ट्र राज्यात संपामुळे विस्कळीत झालेली आरोग्य यंत्रणा पुर्ववत सुरळीत सुरू व्हावी हाच उद्देश सफल करण्यासाठी तत्वतः मागण्या मान्य केल्या असाव्यात यात शंका नाही.
