अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
कराडमध्ये शस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या :- उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील..!!
विद्या ठोमे सातारा जिल्हा प्रतिनिधी
कराडच्या शहर परिसरांत बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल घेवुन वावरणाऱ्या दोन सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये स्वप्निल प्रदीप जगताप (वय 27 ) रा. सुलतानपूर एमआयडीसी वाई ) आणि अजय संभाजी लांदे (वय 33) रा. सुलतानपूर एमआयडीसी वाई मूळ रा. गोवारे ता. कराड) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडूंन पिस्तूल चार जिवंत काडतुसे आणि मोबाईल असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ( नूतन डीवायएसपींची दुसरी कारवाई ) आगामी निवडणुका आणि गणेशोत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने कराडच्या डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या पथकांने रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती सुरू केली आहे तसेच खबऱ्यांचे नेटवर्क कामाला लावले आहे. कराड उपविभागाचा पदभार घेतल्यापासून राजश्री पाटील यांनी कलेली ही दुसरी कारवाई केली आहे. (पाळत ठेवून सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या ) स्वप्निल जगताप आणि अजय लांदे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत देशी बनावटीचे पिस्तूल घेवुन कराड परिसरांत वावरत असल्याची माहिती डीवायएसपी राजश्री पाटील यांना मिळाली होती. (डीवायएसपी पथकाचं वरिष्ठांकडून विशेष कौतुक) या कारवाईबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी कराडच्या डीवायएसपी आणि त्यांच्या पथकांचे विशेष कौतुक केले आहे.
