अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
कराडच्या नूतन डीवायएसपी राजश्री पाटील मॅडम यांचे पुरीगोसावी यांच्याकडून स्वागत..!!
विद्या ठोमे सातारा जिल्हा प्रतिनिधी
सातारा जिल्हा पोलीस दलात प्रथमच नव्याने रुजू झालेल्या कराड तालुक्यांच्या नूतन उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील मॅडम यांची आज रोजी सदिंच्छा भेट घेवुन संभाजी पुरीगोसावी सातारकरांनी प्रथम आपला परिचय देत जयहिंद मॅडम नमस्कार असे म्हणत त्यांचे स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. राजश्री पाटील यापूर्वी सांगली पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरुची या ठिकाणी कार्यरत होत्या. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अमोल ठाकूर यांच्या बदलीनंतर कराड उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून राजश्री पाटील यांची मागील काही दिवसापूर्वी नियुक्ती झाली होती. महाराष्ट्र पोलीस खात्यात कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून त्यांना चांगलेच ओळखले जाते. मागील महिन्याभरांपूर्वी सातारा जिल्ह्यातील चार उपविभागीय पोलीस अधिकारी ( डीवायएसपी ) दर्जेतील अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या होत्या. राजश्री पाटील यांनी पदभार घेतल्यापासून कराड तालुक्यांच्या विभागात दोन दमदार कारवाया त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देखील त्यांनी परफेक्ट नियोजन केले होते. आदरणीय डीवायएसपी पाटील मॅडम यांच्या सदिंच्छा भेटीत संभाजी पुरी गोसावींनी मनमोकळा संवाद साधत त्यांचे आभार मानले,
