कोरेगावांत पर राज्यांतील महिलांचा चालतोय वेश्या-व्यवसाय जोमात प्रशासन मात्र कोमात
माधवी गिरीगोसावी सातारा जिल्हा प्रतिनिधी
कोरेगांव तालुक्यांत परराज्यांतील महिलांचा वेश्या-व्यवसाय अजुनही जोमात सुरूच आहे अनेकवेळा प्रसार माध्यमांतून वृत्त हाती घेऊनही पोलीस निरीक्षकांना समक्ष निवेदन देवुनही कोरेगांव पोलीसांची अद्याप कारवाई करत नाही… मात्र कोरेगांवच्या एसटी स्टँड परिसरांत हॉस्पिटल आणि मार्केट व्यापाऱ्यांच्या लाईन मधील पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या या वेश्या-व्यवसायाला नक्की कुणाचा आशीर्वाद असे म्हणण्यातही काय वागवे ठरणार नाही ! यापूर्वीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे,प्रकाश धस,डीवायएसपी प्रेरणा कट्टे यांनी धडक कारवाई केली होती यावेळी कोरेगावातला काहीकाळ वेश्या व्यवसाय बंद झाला होता… मात्र आता कोरेगावात नव्याने दाखल झाल्यापासून या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर अद्याप अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई होत नाही. मात्र या वेश्या-व्यवसाय करणाऱ्या महिलांना नक्की कुणाचा आशीर्वाद अशी म्हणण्याची वेळ चांगलीच उपस्थित होत आहे.
