अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
प्रतिनिधी – एरंडोल येथील
गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी
विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत तालुका स्तरावर यश संपादन केले असून आता त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
याप्रसंगी फलक सिद्धेश महाजन या विद्यार्थिनीची निशाणाबाजीत प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरावर निवड झाली. पारुल अभय परदेसी, गौरी विशाल परदेसी व मोहित संजय महाले या तीनही विद्यार्थ्यांनी बुद्धिबळ स्पर्धेमध्ये तालुक्यात विजयी होऊन जिल्हास्तरावर प्रवेश मिळवला आहे. कनिष्का, दीप्ती, गौरी, वैष्णवी, श्रावणी, आराध्या या 14 वर्षाच्या आतील विद्यार्थिनींची रिंगटेनी क्वाईट मध्ये जिल्हास्तरावर निवड झाली तर प्रसाद,ओम, यश, प्रथमेश आणि नैतिक या चौदा वर्षाच्या आतील विद्यार्थ्यांची सुद्धा रिंगटेनी क्वाईट स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
हॉलीबॉल स्पर्धेत मुलींच्या व मुलांच्या दोन्ही टीमने तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला असून बॅडमिंटनमध्ये देखील द्वितीय क्रमांक मिळवला आहे.क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळेने नेहमीच केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फळ असल्याचे संस्था अध्यक्ष सचिन विसपुते यांनी सांगितले.
या यशाबद्दल ग्रामीण उन्नती शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुषा विसपुते, प्राचार्य सुनील ठाकरे, क्रिडाशिक्षक रोहित सपकाळे, शिक्षक,शिक्षिका व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
