अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
महाराष्ट्र किर्ती पुरस्कार २०२५ प्राप्त मानकरी श्री रेणुकादासजी मुळे यांचा भवताल थिएटर चिखली तर्फे सत्कार.
प्रतिनिधी सारंग महाजन
रविवार दि: 6 सप्टे ला भवताल थिएटर चिखली कलारसिक भगिनी निवेदिता वाचनालय य येथे एकत्र जमले होते निमित्य होते महाराष्ट्र किर्ती पुरस्कार २०२५ या पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीरेणुकादास जी मुळे यांचा अनौपचारिक सत्कार. हा सत्कार तरुण भारतचे पत्रकार आणि भवताल थिएटरचे मार्गदर्शक श्री पवनजी लढ्ढा यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी रेणुकादासगी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आगुबाजुला सवंग पत्रकारितेचे वातावरण असतांना तत्वाशी बांधिलकी ठेऊन पत्रकारिता या क्षेतात कार्यरत राहण्याची उर्जा आपले संस्कार, वाचन, आणि समाज उपयोगी कार्यातून मिळणारे समाधान यातून मिळते. असे मुळे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. कार्याक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. ज्योतिताई खरात होत्या. वाचक मंच या मंचाच्या संकल्पनेविषयी त्यांनी या प्रसंगी माहीती दिली.
प्रत्येकी दोन आठवड्यातून वाचकमंचचे सदस्य एकत्र जमून या दरम्यान वाचलेल्या पुस्तकांबाबत चर्चा करतील अशी मंचाची योजना आहे. अधिकाअधिक वाचकांनी , श्रोत्यांनी या मंचात सहभाग नोंदवावा असे त्यांनी आवाहन केले. रंगगंध कलासक्त न्यास या संस्थे ची राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेचे प्राथमिक केंद्र भवताल थिएटर चिखली आहे. या स्पर्धेचे पोस्टर अनावरण श्री पवनजी लढ्ढा यांच्या हस्ते झाले. दैनदिन वाचन ते अभिजात साहित्याचं वाचन हा वाचन प्रवास जीवन समृद्ध करणारा आहे असे पवनजी यांनी आपले विचार मांडले.
भवताल थिएटरचे प्रमुख विनय शुक्ल यांनी अभिवाचन स्पर्धेत उस्फुर्त सहभागासाठी सर्वांना आवाहन केले. स्पर्धेची माहिती , विषय, नियम याविषयी विनय शुक्ल यांच्याशी संपर्क साधावा.
या अनौपचारिक सत्कार समारंभाला भवताल थिएटर च्या सभासदांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. पवन जी लढढा यांनी भगिनि निवेदिता वाचनालयातील ग्रंथसंपदा विषयी ग्रंथपाल सौ . अपर्णा कुळकर्णी यांच्याशी संवाद साधला.
श्री सारंग महाजन यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
